मोहिमेत काम करणाऱ्या शिक्षकांचा कोट
मी सवड येथील व्हीआरआरटी पथकात काम करतो. माझ्याप्रमाणेच वरुड गवळी येथील मुख्याध्यापक बेंगाळही या कामात होते. ते बाधित झाले व त्यांचा आज मृत्यू झाला. त्यामुळे विमा संरक्षण अत्यंत गरजेचे आहे.
-चांदबा खिल्लारे, मुख्याध्यापक
मी शिक्षक संघटनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून विमा संरक्षणाची मागणी केली आहे. तर मीही व्हीआरआरटी पथकात आहे. मात्र आम्हाला कोणतेच विमा संरक्षण नाही. शासनाने त्वरित असे आदेश काढले पाहिजे.
-रामदास कावरखे, मुख्याध्यापक
माझ्या शाळेतील काही शिक्षकांना चेकपोस्ट, रेशन दुकानावर कोराेना काळात नियुक्ती दिली होती. शहरी भागात असल्याने व्हीआरआरटी पथक नाही. मात्र, यातील एका शिक्षकाचा नुकताच कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे विमा संरक्षण हवेच.
- प्रकाश निकळकंठे, मुख्याध्यापक
कोरोना साथरोग नियंत्रण मोहिमेतील शिक्षक
८७९
शिक्षकांचा मृत्यू
३
कुटुंबीयांना विमा मिळाला
०
कोरोनाच्या नियंत्रणात व्हीआरआरटी समित्यांत मुख्याध्यापक अथवा शिक्षक नेमले आहेत. मात्र, शासनाकडून अथवा जि.प.ने शिक्षकांसाठी विमा संरक्षणाच्या काही सूचना दिल्या नाहीत. यात काम करणाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांनी प्रस्ताव दिल्यास शासनाकडे पाठविण्यात येईल.
-संदीपकुमार सोनटक्के, शिक्षणाधिकारी