लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : ज्याचा वर्ग कोणी चुकवतच नाही, तोच चांगला शिक्षक होय. शिक्षकाचा प्रभाव पुढच्या पिढीपर्यंत असतो. चांगले शिक्षक बनण्यासाठी फार परिश्रम घ्यावे लागतात, ते प्रत्येकाला जमणे अशक्य आहे, मात्र यासाठी प्रत्येकानी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन स्वारातीमचे माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांनी हिंगोली येथील शिवाजी महाविद्यालयात २१ डिसेंबर रोजी आयोजित ‘अक्षरपथ’ प्रकाशन सोहळ्यात केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक भ. मा. परसवाळे होते. यावेळी शिक्षण सभापती भैय्या देशमुख, जि.प.सदस्य अंकुशराव आहेर, कवी विलास वैद्य, शिक्षणाधिकारी दीपक चवणे, अशोक अर्धापूरकर, मंदाताई पवार यांची उपस्थिती होती. डॉ. वाघमारे यांनी प्रथम शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांच्या शैक्षणिक जीवन-कार्याच्या प्रवासाबद्दल माहिती दिली. तसेच अक्षरपथ पुस्तकातील निवडक वाक्यांचे स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, प्रत्येकाची कथा इतिहास असतो, जीवनात ज्या काही चांगल्या गोष्टी असतील त्या आत्मकथेत असायला हव्यात.शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, अनेक महापुरुषांनी शिक्षणाचे महत्त्व समाजासमोर मांडले आहे. महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरूषांचे शिक्षणाबद्दलचे विचार त्यांनी सांगितले. ‘आत्मकथा’ नेमकी कशी असते, त्यात कुठला इतिहास दडलेला असतो, या विषयावर डॉ. वाघमारे यांनी प्रकाश टाकला.
शिक्षकांचा ‘प्रभाव’ पुढच्या पिढीपर्यंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 12:17 AM
लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : ज्याचा वर्ग कोणी चुकवतच नाही, तोच चांगला शिक्षक होय. शिक्षकाचा प्रभाव पुढच्या पिढीपर्यंत असतो. ...
ठळक मुद्देहिंगोली : ‘अक्षरपथ’ प्रकाशन सोहळा थाटात