लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : वसमत तालुक्यातील आरळ येथील अन्नपूर्णादेवी कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न अजूनही लटकलेलाच आहे. या शिक्षकांनी आपला प्रश्न न सुटल्यास प्रजासत्ताक दिनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.या शिक्षकांनी काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर आंदोलन केले होते. या शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व सचिव तथा मुख्याध्यापिका रजनी मोरे यांनी अधिकाºयांना हाताशी धरून आॅगस्ट २0१८ पासून वेतन स्थगित केल्याचा आरोप निवेदनात केला आहे. त्यामुळे कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. औरंगाबादच्या उपसंचालकांनी वेतन अदा करण्याचा आदेश २८ आॅगस्ट २0१८ रोजी दिला आहे. त्यानंतर पुन्हा २९ नोव्हेंबर २0१८ लाही आदेशित केले होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका या शैक्षणिकदृष्ट्या अपात्र असल्याचे तपासणी अहवालात सिद्ध होऊनही शिक्षणाधिकारी कार्यवाही करीत नसल्याचा आरोप हे शिक्षक गेल्या अनेक दिवसांपासून करीत आहेत. मात्र शिक्षण विभाग यावरून कानावर हात ठेवत असल्याने यामागे नेमकी काय गोम आहे, हे कळायला मार्ग नाही.या निवेदनाची दखल घेऊन वेतन अदा करून संबंधित दोषींवर कारवाई न केल्यास सामूहिक आत्मदहनाचा इशारा एस.एस. कायंदे, व्ही.एल. कोतापल्ले, पी.डी. घोडे व एन.पी. पठाण या शिक्षकांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती इतरही जवळपास ११ विभागांना दिल्या असल्याचे दिसून येत आहे.
‘त्या’ शिक्षकांचा पुन्हा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2019 12:07 AM