लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : तथागत बुद्धाची शिकवण महान व आदर्श आहे. बौद्ध धम्माचा पाया सर्वश्रेष्ठ असून आचरणशिल आहे. त्यामुळे तथागत भगवान गौतम बुद्धांची शिकवण महान असून धम्माचे वलय मोठे आहे, असे प्रतिपादन पु.भदन्त धम्मसेवक महाथेरो यांनी आयोजित सतराव्या बौध्द धम्म परिषदेत केले.धम्मदेसना देताना पुज्य भदन्त धम्मसेवक महाथेरो म्हणाले की, सामाजिक असमानतेच्या दरीचे उग्र स्वरूप मानव जातीस नष्ट केल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे जगाचा नाश होईल. गौतम बुद्धांनी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायाची शिकवण देऊन समान जीवनातील असमानतेचे बुरूज नष्ट केले. त्याचबरोबर अज्ञान व तत्कालीन दु:खाचा बीमोड करण्याचा मार्ग शिकवला. अखिल मानव जात प्रबुद्ध बनविने हे बुद्धाच्या शिकवणुकीचा मुख्य पाया आहे. असे त्यांनी यावेळी सांगितले. शहरासह जिल्हाभरातून समाजबांधव धम्म परिषदेत आले होते. यावेळी पूज्य भंन्ते यांनी उपस्थितानांना धम्मदेसना दिली. तसेच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.धम्म परिषदेचे अध्यक्ष पू. भिक्खू धम्मसेवक महाथेरो, पू. भदन्त प्रा. डॉ. खेमधम्मो महाथेरो, पू. भिक्खू डॉ. उपगुप्त महाथेरो, पू. भिक्खू ज्ञानरक्षित थेरो, पू. भिक्खू पय्यारत्न थेरो, पू. भिक्खू पय्याबोधी तसेच पु.भिक्खू शरणानंद महाथेरो, पु.भिक्खू धम्मदिप महाथेरो, प्रा.डॉ.सत्यपाल महाथेरो, यश काश्यपायन महाथेरो, काश्यप महाथेरो, विनयबोधी प्रियथेरो, करूणानंद थेरो, महाविरो थेरो, मुदीतानंद थेरो, प्रज्ञापाल, शिलरत्न, सुभूती, बोधीशिल, संघपाल, संघप्रिय, रेवतबोधी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी डॉ. एस. पी. गायकवाड, गणेश लुंगे, नंदकिशोर कांबळे, प्रकाश इंगोले, जळबा शेवाळे आदी उपस्थित होते. धम्म परिषदेचे मुख्य संयोजक पू. भिक्खू काश्यप महाथेरो, सह संयोजक पू. भिक्खू धम्मशील, पू. भिक्खू पय्यानंद आदींनी धम्म परिषदेचे नियोजन केले. सुप्रिया महिलामंडळाने परिश्रम घेतले.
बुद्धांची शिकवण महान आदर्श
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 12:46 AM