लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात योग्य साईट मिळत नसल्याने जि.प.च्या लघुसिंचन विभागाच्या पाझर तलाव, कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे व जलयुक्त शिवारमधील जवळपास १0 कोटी रुपयांचा निधी शिल्लक आहे. गतवर्षी जलयुक्तचे ४४.८५ लाख परत पाठविण्याची नामुष्की या विभागावर ओढवली होती.हिंगोली जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाला पूर्णवेळ कार्यकारी अभियंता मागील अनेक दिवसांपासून नाही. त्यातच खालीही रिक्त पदांची संख्या वाढल्याने अपुऱ्या अभियंत्यांवर या विभागाचा कारभार सुरू आहे. त्यातच पाझर तलाव व कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाºयांसह विविध कामांसाठी शासनाने आता निकष बदलले आहेत. काही बाबी शिथिल केल्या तर काहींमध्ये काम करणेच अवघड झाले. त्यातच कामांची निश्चिती होत नसल्याने गतवर्षीचाच ल.पा.चा ६.८७ कोटींचा निधी अखर्चित आहे. केवळ ८८ लाख खर्च झाले. कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाºयांचा १.२८ कोटी खर्च व १३ लाख शिल्लक, ओटीएसपीत ७६ लाख खर्च व ४५ लाख शिल्लक, जलयुक्त शिवारमध्ये ९९ लाख खर्च २.६१ कोटी रुपये शिल्लक असल्याचे दिसून येत आहे.२0१८ अखेर लपाचे लोहरा, देवजना, लोहरा खु., कुरुंदा नेहरूनगर, ताकतोडा क्र.३ ही कामे भौतिकदृष्ट्या पूर्ण झाली. तर केंद्रा खु., वारंगा मसाई, बोंडाळा, हयातनगर क्र.२, वसई ही कामे प्रगतीत आहेत. सुरेगाव क्र.२, आसेगाव, वडद, सावळी खु. या तलावांची कामे पूर्ण तर सापटगाव क्र.४ ची निविदा वाटाघाटीत अडकली आहे.कोल्हापुरी बंधाºयांची आडगाव क्र.३, रामेश्वर क्र.२, शिरडशहापूर क्र.६, चिखलागर तांडा, तांदूळवाडी, पुरजळ क्र.३, हत्तावाडी, रामेश्वर सिनाबा, येडशी, लिंबाळा म.जामवाडी, खिल्लार ही कामे पूर्ण झाली आहेत. पांगरा सती, पळशी, पारडा, मन्नास पिंपरी प्रगतीत व हट्टा क्र.२ भौतिकदृष्ट्या पूर्ण झाले.ओटीएसपीत तलावांची उमरदरावाडी क्र.१, खापरखेडा, कुंभारवाडी त.चाफनाथ ही कामे पूर्ण झाली. नागझरी क्र.१ व २, रामवाडी ही कामे प्रगतीत तर वारंगा क्र.७, तोंडापूर क्र.६ व ७ ही कामे निविदेत अडकली असल्याचे दिसून येत आहे.ओटीएसपी कोपबची धानोरा जहांगिर, जटाळवाडी क्र.२, वारंगा क्र.५, मुंढळ क्र.३, घोळवा क्र.४, जामगव्हाण क्र.३ ही कामे पूर्ण तर तोंडापूर क्र.५, करंजाळा क्र.५, भुरक्याची वाडी, वाळकी क्र.४ ही कामे प्रगतीत आहेत.
‘लघुसिंचन’ चे दहा कोटी पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 1:04 AM