लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : औरंगाबाद बोर्डाकडून इयत्ता दहावीच्या परीक्षेस १ मार्चपासून सुरूवात झाली आहे. हिंगोली जिल्ह्यातील एकूण ५३ परीक्षा केंद्रावरून केंद्रावरून इयत्ता दहावीची १६ हजार ५६६ पैकी १६ हजार २५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर पहिल्याच मराठी विषयाच्या पेपरला ३१२ विद्यार्थी गैरहजर राहिले.दहावीची परीक्षा १ ते २२ मार्च या कालावधीत घेण्यात येणार आहे. डायटचे प्राचार्य गणेश गणेश शिंदे यांनी हिंगोली तालुक्यातील सिरसम येथील चंदूलाल मुंदडा हायस्कूल परीक्षा केंद्राला भेट दिली असता एक विद्यार्थी परीक्षेत नक्कल करताना त्यांना आढळून आला.कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यावर कार्यवाही करण्यात आल्याची माहिती परीक्षा विभााातर्फे देण्यात आली. तसेच शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी कळमनुरी तालुक्यातील परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. तर उपशिक्षणाधिकारी डी.के.इंगोले, उप शिक्षणाधिकारी तानाजी भोसले यांनीही विविध परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. परीक्षेसाठी ९१६ पर्यवेक्षकांची तालुका अंतर्गत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांची अदलाबदल करून नियुक्ती करण्यात आली.परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष यांनी परीक्षा केंद्रांना भेटी देण्यासाठी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना आदेशीत केले असून फिरत्या पथकाद्वारे केंद्रांना भेटी दिल्या जात आहेत. शांततामय व कॉपिमुक्त वातारणात विद्यार्थ्यांनी पेपर सोडवावा. परीक्षेत नक्कल करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के यांनी सांगितले.
दहावीची परीक्षा सुरू, कॉपीबहाद्दर पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 11:35 PM