रेल्वेमध्ये नोकरी लावतो म्हणून वसमत येथील एकाला दहा लाख रुपयांना फसविल्याप्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा व वसमत शहर पोलीस करीत होते. या प्रकरणी पथकाने नांदेड, मुंबई, दिल्ली, लखनऊ येथून सात जणांना ताब्यात घेतले. तसेच त्यांच्याकडून २० लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून राष्ट्रीय पातळीवरील गुन्हा उघडकीस आणला. हिंगोलीच्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, साहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, वसमत शहरचे पोलीस निरीक्षक शिवाजी गुरमे, स.पो.नि. पंढरीनाथ बोधनापोड, पोलीस उपनिरीक्षक शिवसांब घेवारे, पो.ना. किशोर कातकडे, पो.शि. विठ्ठल काळे, वामन पवार, सायबरचे इरफान पठाण, जयप्रकाश झाडे, पो.ना. संदीप चव्हाण, रवी ठेंबरे, बालाजी वडगावे, विवेक गुंडरे आदींचा समावेश होता.
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशस्तिपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 4:21 AM