हिगोंली : हिंगोली येथील सार्वजनिक दसरा महोत्सव सर्वदूर प्रसिद्ध असून दसऱ्याला १६७ वर्षांची परंपरा लाभली आहे. या महोत्सवानिमित्त येथील रामलीला मैदानावर सार्वजनिक दसरा महोत्सव समिती व प्रशासनाच्या वतीने बासापूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विधीवत पूजाअर्चा करण्यात आली. कोरोनामुळे मागील दोन वर्षांपासून दसरा महोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा लागला होता. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे निर्बंध हटविण्यात आले आहेत. त्यामुळे येथील दसरा महोत्सव उत्साहात हजार होणार आहे.
या महोत्सवाकरीता बासापूजन करण्यात आले. यावेळी आ. तानाजी मुटकुळे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उप विभागीय अधिकारी उमाकांत पारधी, न.प.चे उप मुख्याधिकारी उमेश हेंबाडे, तहसीलदार नवनाथ वगवाड, नायब तहसीलदार ऋषी, खाकी बाबा मठाचे महंत कौशल्यदास महाराज, वकील संघाचे अध्यक्ष ॲड.किरण नर्सीकर, ॲड.पंजाब चव्हाण, विश्व हिंदू परिषदचे सावरमल अग्रवाल, राजेंद्र हलवाई, श्याम खंडेलवाल, संजय ढोके, धोंडीराज पाठक महाराज, रामधन दराडे, गोळेगावकर, ॲड.सुनिल भुक्तर, गणेश शाहु, ॲड.बापुराव बांगर, कोटकर, के.के.शिंदे, विलास गोरे, सचिन शिंदे, न.प.चे कर्मचारी संदिप घुगे, दौलतराव बनसोडे, सुधाकर बनसोडे, भास्कर इंगोले, विजय बनसोडे, ॲड.राजेश गोटे, धनमने आदींची उपस्थिती होती.