शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

इलेक्टिव्ह मेरिटचा मुद्दा, भाजपच्या अडेलतट्टूपणासमोर शिंदे सेनेचे लोटांगण

By विजय पाटील | Published: April 03, 2024 11:18 AM

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जर शिंदे सेनेच्या विद्यमान खासदारांना तिकिटे मिळणार होती, तर तेथे भाजपने तयारी करणेच गैर होते. मात्र तरीही तो प्रकार घडला.

हिंगोली : राज्यात अनेक ठिकाणी भाजपच्या मंडळीने इलेक्टिव्ह मेरिटचा मुद्दा पुढे करीत शिंदे सेनेच्या जागांवर दावा केला. त्यापैकीच एक असलेल्या हिंगोली लोकसभेत उमेदवारी जाहीर केल्यानंतर इतर पर्यायांचा विचार करावा लागत आहे. त्यामुळे भाजपच्या अडेलतट्टूपणासमोर शिंदे सेना लोटांगण घालत असल्याचा संदेश जात असून याचा फटका बसण्याचीच जास्त शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर जर शिंदे सेनेच्या विद्यमान खासदारांना तिकिटे मिळणार होती, तर तेथे भाजपने तयारी करणेच गैर होते. मात्र तरीही तो प्रकार घडला. शेवटी पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी उमेदवार कामाला लावले असे सांगत भाजपकडून हा प्रकार रेटून नेला जात होता. मात्र हे संघटन मजबूत करण्याच्या नादात शिंदे गटाशी भाजपची दुफळी निर्माण झाली. ही दुफळीच आता थेट ही जागा धोक्यात आणते की काय? अशी भीती निर्माण झाली. एवढेच काय तर आगामी लोकसभा निवडणुकीतही शिंदे सेना व भाजपच एकमेकांविरोधात काम करून पाडापाडीच्या राजकारणाला वेग देण्याची शक्यता नाकारता येत नाही. आतापर्यंत पक्षाच्या नावाखाली चालू असलेले राजकारण आता वैयक्तिक पातळीवर उतरले आहे. कोणी कसा जाणीवपूर्वक गेम करतेय, हे दोन्हीकडच्याही कार्यकर्त्यांना दिसत आहे. हिंगोलीचे पडसाद जसे नांदेड लोकसभेत उमटले. तसे उद्या विधानसभेतही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शेवटी इलेक्टिव्ह मेरिटही भाजपच ठरवित असल्याने तगड्यांना सोडून दुबळ्यांना पाचारण करून भाजप नेमके काय साध्य करणार आहे? हे कळायला मार्ग नाही. मात्र आता शिंदे सेनेतही यावरून अंतर्गत संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

भाजपने घेतलेल्या बैठकीनंतर हिंगोली लोकसभेतील वातावरण बिघडले. उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी करणाऱ्या हेमंत पाटील यांनी ती टिकविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. कालपासून ते व त्यांचे समर्थक मुंबईत ठाण मांडून बसले आहेत. मात्र आश्वासनाच्या पलिकडे त्यांच्या हाती सध्या तरी हाती काही आले नाही. दुसरीकडे भाजपमधील मंडळींना हाती धुपाटणे येणार असल्याचे लक्षात येताच निदान विधानसभेला तरी त्रासदायक ठरू नये म्हणून हेमंत पाटील यांना विरोध नाही, आम्ही आमच्यासाठी उमेदवारी मागत होतो, असे म्हणण्याची वेळ आली आहे. ही उपरती होण्यास इतका विलंब झाला की, तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे.

आता तरी उमेदवारीवर एकमत होणार?मुख्यमंत्र्यांनी आणखी एका सर्व्हेक्षणाचा अहवाल येणार असल्याचे सांगून पाटील यांची उमेदवारी अद्याप रद्द केली नाही. दुसरा पर्यायही तयार ठेवला आहे. मात्र या पर्यायालाही बाहेरचा उमेदवार अल्पावधीत पूर्ण मतदारसंघ कव्हर करेल का? अशी नावे ठेवली जात आहेत. त्यामुळे भाजपच्या मंडळीला त्यांचा उमेदवार दिल्याशिवाय समाधान लाभणार नसल्याचे दिसत आहे. यात वेळ मात्र निघून जात असून दुसरीकडे महाविकास आघाडी प्रचाराला लागली आहे. यावेळी जागा पाडून भविष्यात या जागेवर दावा करण्याचा मार्ग मोकळा करण्यासाठीही भाजपकडून ही खेळली जात असावी, अशी चर्चाही रंगत आहे. तर जिल्ह्यातून एखादा बंडखोर देवून भाजप आपले इप्सित साधू शकते, या चर्चेलाही तोंड फुटले आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीBJPभाजपाShiv Senaशिवसेना