शहरं
Join us  
Trending Stories
1
जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!
2
'एक्झिट पोलमुळे लोकांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा...' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना प्रश्न
3
निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका
4
पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."
5
"निवडणूक एका टप्प्यात, आता ते सुद्धा एकाच टप्प्यात...", जयंत पाटलांचा महायुतीला टोला
6
…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण
7
Video: विराट कोहलीचा भन्नाट झेल! न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेआधी नेट प्रक्टिसमध्ये केली कमाल
8
70 हजार रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या बाईक आणि स्कूटर... दिवाळीपूर्वी खरेदी करण्याचा बेस्ट ऑप्शन!
9
रश्मी शुक्लांना निवडणूक आयोग हटवणार का?; निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले...
10
पेजर हॅक केलं जाऊ शकतं, मग ईव्हीएम का नाही? मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Date: महाराष्ट्राच्या महासंग्रामाचा शंखनाद! विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात; २० नोव्हेंबरला मतदान, तर निकाल...
12
कोण होणार भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष?; निवडणुकीसाठी बनवली समिती, जाणून घ्या प्रक्रिया
13
"तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय..."; फडणवीसांचं नाव घेत मनोज जरांगे काय बोलले?
14
या गंभीर आजाराने ग्रस्त आहे आलिया भट, खुद्द स्वतःच 'जिगरा' स्टारने केला खुलासा
15
Kamran Ghulam चा शतकी नजराणा! पदार्पणात असा पराक्रम करणारा पाकचा दुसरा वयस्क बॅटर
16
'इन्फ्लुएन्सर्स' हा नवा आजार आला आहे...अभिनेत्री सीमा पाहवा भडकल्या; ही कोणाची चूक?
17
टाटा समूहाची मोठी घोषणा, पुढील पाच वर्षात 5 लाख तरुणांना नोकऱ्या देणार
18
रिस्क नकोच! आपल्या स्टार गोलंदाजाबद्दल Rohit Sharma अगदी स्पष्टच बोलला!
19
यूपी, बंगालसह १५ राज्यांतील विधानसभेच्या ४८ जागांसाठी रंगणार पोटनिवडणूक, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला  
20
महाराष्ट्राबरोबरच झारखंडमध्येही वाजलं निवडणुकीचं बिगुल, दोन टप्प्यांत होणार मतदान 

अंदाज चुकला अन् रिव्हर्स घेताना कार तलावात गेली, युवकाचा कारमध्ये गुदमरून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2022 1:38 PM

औंढा येथील गंधकुटी तलावाची घटना क्रेनच्या साह्याने कार व मृतदेह काढला बाहेर

औंढा नागनाथ (हिंगोली) : रिव्हर्स घेताना अंदाज न आल्याने कार गंधकुटी तलावात बुडाली. यात वेळीच कार बाहेर पडता न आल्याने चक्रधर सावळे (२०) या युवकाचा गाडीतच गुदमरून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. बुडालेली कार क्रेनच्या सहाय्याने तलावातून बाहेर काढण्यात आली.

सविस्तर असे की, औंढा नागनाथ येथील गंधकुटी तलावाजवळच चक्रधर गजानन सावळे यांचे दुकान आहे. ते निशाणा येथे राहतात. रात्री त्यांचे वडील गजानन साळवे यांनी गावाकडे चार चाकी गाडी घेऊन ये असे सांगितले होते. त्यानुसार चक्रधर औंढा येथे येऊन बुधवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास गावाकडे जाण्यासाठी आपल्या कारने ( एम एच 14बी सी 1397)  निघाला. परंतु, कार रिव्हर्स घेत असताना रस्त्याच्या बाजूलाच असलेल्या गंधकुटी तलावात कार गेली त्यानंतर कठीणसमयी दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्या चक्रधरचा गाडीतच मृत्यू झाला.

दरम्यान, नातेवाईकांनी त्याचा दिवसभर शोध घेतला असता परंतु सापडला नाही. तसेच वडिलांनी सगितल्याप्रमाणे गाडीसुद्धा दिसत नसल्याने सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता गाडी तलावात गेल्याचे उघडकीस आले. त्यानंतर नगराध्यक्ष कपिल खंदारे, नगरसेवक मनोज देशमुख, पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे बीट जमादार संदीप टाक संस्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन रात्री उशिरा क्रेनच्या मदतीने कार बाहेर काढली असता त्यात मृतदेह आढळून आला.

तलावास संरक्षक भिंत वा कुंपण नाही. बाजूनेच महत्त्वाच्या कार्यालयाकडे व नागेश्वर नगरकडे जाणारा रस्ता असल्याने या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. सध्या पावसामुळे तलाव तुटुंब भरल्याने या रस्त्यावरचा प्रवास धोकादायक झाला आहे. घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

तलावाला कठडे बसविण्याची मागणीऔंढा नागनाथ येथील मदिराच्या पूर्व दिशेला दोन तलाव आहेत. ही दोन्ही तलाव तुडुंब भरले आहेत. या ठिकाणी ये जा करणाऱ्याची मोठी वर्दळ असते कुठेही सूचना फलक नाही त्या मुळे येथील परिस्थिती धोकादायक झाली असल्याने तलावाला कठडे बसविण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीAccidentअपघात