तीन वर्षांपूर्वी ही भरती झाली होती. त्यावेळी काही ठिकाणची प्रक्रिया वादातही सापडली होती. यावरून विविध प्रकारचे आरोपही झाले. मात्र पुढे त्यात काहीच झाले नाही. त्यानंतर मात्र जिल्ह्यात पोलीस पाटलाची पदे भरण्यासाठी कोणतीच प्रक्रिया केली नाही. शासनस्तरावरूनही तसे काही आदेश आले नाहीत. त्यातच कोरोनामुळे तर प्रशासकीय भरतीची प्रक्रिया रखडून पडलेली असल्याने पोलीसपाटील पदाची भरती होण्यासाठी आणखी प्रतीक्षाच करावी लागणार असे चित्र आहे. कोरोनाच्या काळात अनेक गावांत पोलीसपाटील नसल्याने ग्रामीण भागात झुंडीने फिरणाऱ्यांची माहिती पोलिसांना देऊन त्यांना अटकाव घालण्यात अडचणी आल्याचे पाहायला मिळाले.
इतरही अनेक प्रकरणांमध्ये पोलीसपाटील हा गावात महत्त्वाची भूमिका बजावत असतो. गावातील अनेक वाद पोलीस ठाण्यांपर्यंत न येण्यासाठी पोलीसपाटील स्तरावरच सामंजस्य घडवून आणणे शक्य होते. शिवाय गुन्हेगारी प्रवृत्तीवर लक्ष ठेवणारा एक दुवा पोलीस व महसूल प्रशासनाच्या उपयोगी ठरत असतो.
उपविभागनिहाय रिक्त पदे...
उपविभागमंजूर पदेभरलेली रिक्त पदे
हिंगोली २६२ १७५ ८७
कळमनुरी १४० ७२ ६८
वसमत २४५ १४३ १०२
एकूण ६४७ ३९० २५७