लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हा परिषद व अनुदानित खाजगी शाळा अशा एकूण जवळपास १ हजार ३२ शाळांतून सुमारे १.५ लाखांच्या वर विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार योजनेचा लाभ दिला जातो. मात्र मागील पंधरा दिवसांपासून धान्यादी मालाचा पुरवठा झाला नसल्याचे मुख्याध्यपकांतून सांगितले जात आहे. त्यामुळे लाखों विद्यार्थ्यी सकस आहारापासून वंचित आहेत.खाजगी अनुदानित व जिल्हा परिषदेच्या शाळेतील पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन दिले जाते. परंतु विविध कारणांमुळे शासनाच्या शालेय पोषण आहारापासून विद्यार्थ्यांना वंचित राहावे लागते. कधी धान्यादी मालाचा वेळेवर पुरवठाच होत नसल्याने विद्यार्थ्यांना सकस आहार मिळत नाही. मागील पंधरा दिवसांपासून पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना धान्यादी मालाच्या तुटवड्यामुळे सकस आहारपासून वंचित राहावे लागत आहे. जि. प. च्या निम्या शाळांत धान्यादी मालाचा तुटवडा असल्याचे समोर आले आहे. कधी तांदुळाचा पुरवठा तर कधी धान्यादी मालाचा पुरवठा वेळेत होत नसल्याने जिल्ह्यात शालेय पोषण आहार योजनेचा बोजवारा उडत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. याबाबत जि. प. शिक्षण विभागातील शापोआ विभागातील संबधित कर्मचाऱ्यांना याबाबत विचारणा केली असता, सध्या तांदुळ व धान्यादीमाल वाटपाची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. धान्यादी माल व तांदुळाच्या पुरवठ्याची आकडेवारीही संबधित शापोआ विभागाकडे उपलब्ध नाही, हे विशेष. धान्यादी मालामध्ये वाटाने, मुगडाळ, हळद, चटणी, गोडतेल, मीठ, मटकी आदींचा समावेश आहे.हिंगोली : शापोआ ‘लेखाजोखा’चे माधन रखडलेशालेय पोषण आहार योजनेचे जमा खर्च यासह इतर लेखाजोखा लिहण्यासाठी मुख्याध्यापकांना वार्षिक १ हजार रुपए दिले जातात. परंतु मागील दोन वर्षांपासून ही रक्कम मुख्याध्यापकांच्या हाती पडली नाही. शिक्षण विभागाकडूनही माहिती देण्यास टाळले जाते.मुख्याध्यापकांच्या लेखाजोखा कामाचा ३१ मार्च रोजीच एसबीआय बँककडे धनादेश दिला असला तरी, संबधित ८७५ मुख्याध्यापकांची यादी बँककडे देण्यात आली नाही.
शाळेत ‘धान्यादी माल’ चा तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 12:47 AM