लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : चोर समजून नाहक अनेकांना मारहाण होत आहे. या घटनांमुळे अनेकांना जीवही गमवावा लागला. त्यामुळे नागरिकांनी मोबाईलवरील अफवांवर विश्वास ठेऊ नये. शिवाय याबाबत काही माहिती प्राप्त झाल्यास पोलिसांनी कळवावे. अफवा पसरविणाºयांवर तात्काळ गुन्हा दाखल केला जाईल अशी माहिती पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी दिली.गावोगावी फिरून पोट भरणाºया भटक्या जमातीतील लोकांना चोर समजून मारहाण केली जात आहे. अफवांच्या आहारी जाऊन त्यांना मारहाण केली जात आहे. त्यामुळे या समाजबांधवांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनखाली सध्या अफवांवर विश्वास न ठेवण्याबाबत जिल्हाभरात जनजागृती केली जात आहे. सार्वजनिक ठिकाण तसेच आठवडी बाजारात भीत्ती पत्रके डकविण्यात येत आहेत. सोशल मिडीयावरील अफवांवर विश्वास ठेऊ नये व कायदा हातात घेतल्यास संबधितांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. विनाकारण समाजघातक अफवा कोणी पसरवत असेल तर पोलिसांना कळविण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांनी केले आहे. याबाबत जिल्हाभरातील पोलीस पाटलांची बैठक बोलावून प्मार्गदर्शन करण्यात आले. कायदा हातात घेणाºयांची गय केली जाणार नाही.
अफवा पसरविणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 12:42 AM