शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

हिंगोलीत थर्टी फर्स्टला थिल्लरपणा चालणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 11:22 PM

सरत्या वर्षाला निरोप देताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, नाकाबंदी तसेच पोलीस गस्त वाढविण्यात येणार असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. तर कोणताही थिल्लरपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सरत्या वर्षाला निरोप देताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, नाकाबंदी तसेच पोलीस गस्त वाढविण्यात येणार असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. तर कोणताही थिल्लरपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा दिला.नवीन वर्षाच्या स्वागतासाठी व सरत्या वर्षाला निरोप देण्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. थर्टीफर्स्टला मद्य विक्रीतून शासनाला जास्तीत जास्त नफा मिळतो. त्यामुळे यादिवशी सकाळी ५ वाजेपर्यंत दारूचे दुकान तसेच बार व रेस्टारंट सुरू असतात. परंतु तरूणाईकडून मद्यधुंदीत काही अनुचित प्रकार घडणार नाही, याकडे पोलीस प्रशासनाची करडी नजर असणार आहे. तसेच दारू पिऊन वाहन चालविणाºयांवर तात्काळ कारवाई केली जाणार आहे. यासाठी पोलीस प्रशासनाकडून ठिक -ठिकाणी बंदोबस्त ठेवला जाईल. तसेच नाकाबंदी केली जाणार आहे. सर्वांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी केले.परवाना- ३१ डिसेंबर रोजी मद्य विकत घेताना ५ रूपये शुल्क आकारून मद्यपानाची परवानगी दिली जाणार आहे.तळीरामांच्या खिशाला बसणार कात्री...नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी ओल्या पार्ट्यांचे नियोजन असते. परंतु शासनाने बीअरवर काही प्रमाणात जादा शुल्क आकारण्याचे ठरविले आहे. साधारणता एका बीअर बाटलीच्या पाठीमागे २५ ते ३० रूपये वाढविण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून विविध अनुज्ञप्त्या बंद करावयाच्या वेळेत सूट देण्यात आली आहे. महाराष्टÑ दारूबंदी कायद्याचे कलम १३९ (१)(सी) व कलम १४३ (२) (एच-१)(्र५) अन्वये नाताळ व नववर्षानिमित्त२४,२५ व ३१ डिसेंबर रोजी राज्यातील विविध मद्यविक्री अनुज्ञप्त्या निर्धारित वेळेनंतर रात्री उशिरापर्यंत उघड्या ठेवण्याची मंजुरी देण्यात आली आहे. अनुज्ञप्तीचा प्रकार, एफएल-२ विदेशी मद्यविक्री २४ ते ३१ डिसेंबर रात्री २२.३० ते दुसºया दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत, एफएलबीआर-२ रात्री २२.३० ते दुसºया दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत, एफएल-३ परवाना कक्ष पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्राच्या व्यतिरिक्त रात्री २३ ते दुसºया दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत, आयुक्तालय परिक्षेत्रासाठी रात्री १.३० ते दुसºया दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत. इ-२, रात्री २२.३० ते दुसºया दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत, एफएल-४, पोलीस आयुक्तालयाच्या परिक्षेत्राच्या व्यतिरिक्त रात्री २३.३० ते दुसºया दिवशी पहाटे ५, नुमुना ई बीअरबार रात्री २३.३० ते दुसºया दिवशी सकाळी ५ वाजेपर्यंत. सीएल-३ क वर्ग नगरपालिका व जिल्हा परिषद क्षेत्रात कॅन्टोॅनमेंट वगळून रात्री १० ते दुसºया दिवशी पहाटे १, त्याच्या व्यतिरिक्त इतर क्षेत्रात रात्री २३.५९ ते दुसºया दिवशी सकाळी १ वाजेपर्यंत अशी वेळेत सूट देण्यात आली आहे.