शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

हिंगोली जिल्ह्यात १३ टँकरवर भागतेय वीस हजार लोकसंख्येची तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2019 12:57 AM

जिल्ह्यात तीन तालुक्यांमध्ये टंचाईच्या झळा तीव्रपणे जाणवत असून १३ टँकरवर २० हजार लोकसंख्येची तहान भागत आहे.

हिंगोली : जिल्ह्यात तीन तालुक्यांमध्ये टंचाईच्या झळा तीव्रपणे जाणवत असून १३ टँकरवर २० हजार लोकसंख्येची तहान भागत आहे.जिल्ह्यात खासगी व तर शासकीय ४ टँकर सुरू आहेत. शासकीय टँकरपैकी दोन कळमनुरी तर दोन औंढा नागनाथ तालुक्यात सुरू आहेत. तर खासगी टँकरपैकी एक कळमनुरीत, आठ सेनगाव तालुक्यात सुरू आहेत. या सर्व टँकरवर ३४ खेपा मंजूर आहेत. प्रत्यक्षात ६९ खेपा होत असल्याचे अहवालात म्हटले आहे. जिल्ह्यात २०९०९ लोकसंख्या टँकरवर तहान भागवत आहे. यात कळमनुरी- ४२१९, सेनगाव- १४५७० तर औंढ्यातील २१२० लोकसंख्येचा समावेश आहे. कळमनुरीत माळधावंडा, खापरखेडा, शिवणी खु., सेनगाव तालुक्यात जयपूर, सेनगाव, कहाकर खु., तर औंढा तालुक्यात रामेश्वर, संघनाईक तांडा व काळापाणी तांडा येथे टँकर सुरू आहे. एकूण ७४ गावांसाठी अधिग्रहण केले. यात हिंगोलीत १७ गावांसाठी १७, कळमनुरीत १८ गावांत १९, सेनगावात १९ गावांत १९, वसमतला ८ गावांसाठी ९ व औंढ्यात १२ गावांसाठी १२ अधिग्रहणे केली आहेत. अजूनही विहिर व बोअर अधिग्रहणाचे प्रस्ताव येत आहेत.बोअरचे ५६ प्रस्तावहिंगोली जिल्ह्यात नवीन बोअर घेण्यासाठी जि.प.कडून ५६ गावांचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे आले आहेत. तर दुरूस्तीचे १५ प्रस्ताव आले आहेत. अजून या प्रस्तावांची छाणनी झाली नाही. छाननीनंतर मंजुरीची कार्यवाही होणार आहे.टंचाईत उपाययोजनांना गती नाहीहिंगोली जिल्ह्यात दरवर्षी टंचाईच्या काळात किरकोळ कारणांनी बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजनांचे नशीब उजळत असते. एरवी देखभाल व दुरुस्तीवर निधी असूनही खर्च न करणाऱ्या जि.प.ला या काळात जाग येते. मात्र यंदा उपायांना गती मिळत नाही.

टॅग्स :HingoliहिंगोलीWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई