चंदगव्हाण येथील गणेश कांबळे यांच्याशी दत्ता नाईक, राजेश नाईक, गंगाबाई नाईक, रत्नमाला नाईक यांच्याशी वाद घातला, तर शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याची नोंद वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात घेण्यात आली आहे.
वाहतुकीस अडथळा; गुन्हा दाखल
हिंगोली : तालुक्यातील कनेरगाव नाका येथे बसस्थानकासमोर वाहतुकीस अडथळा ठरत असलेल्या वाहनांवर १४ सप्टेंबरला गुन्हा दाखल करण्यात आला. टाटा मॅजिक क्रमांक एमएच३८ ४५९८ हे वाहन जिप शाळेसमोर इतर वाहनांना धोका होईल, अशा स्थितीत आढळले. पोलीस कर्मचारी विजय कालवे यांच्या तक्रारीवरून चालक शेख रफिक शेख गफारवर गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला, तर शिवाजी गावंडे या ऑटोचालकाने वाहन क्र. एमएच-३७ जी-१८७८ हेही रस्त्यावर लावले होते. त्याच्यावर नवनाथ शिंदे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला.