जवळा बाजार : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार येथे ३१ डिसेंबर रात्रीच्या वेळी पोलीस नाकाबंदी करीत असताना एका जीपमधून हत्यारासह तिघेजण जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. हट्टा पोलिसांनी ही कारवाई करत एका जीपसह दोन लोखंडी खंजीर जप्त केले आहेत.
३१ डिसेंबर राेजी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण रस्त्याने ये - जा करत हाेते. त्यामुळे रात्रीच्या वेळी पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली. यादरम्यान १ जानेवारी रोजी रात्री १ वाजता सुमारास हट्टाकडून जवळा बाजारकडे येत असलेली एमएच ३८- ७६५५ मधून तिघे जण प्रवास करीत होते. या तपासणीत त्यांच्याजवळ दोन लोखंडी खंजीर आढळून आले. यानंतर पोलिसांनी जीपसह तिघांवर कारवाई केली. ही कारवाई हट्टाचे सपोनि गजानन मोरे, पोलीस नायक राजेश ठाकूर, अरविंद गजभार, खतीब, कावरखे, नागनाथ, नजान, राजाराम कदम, राजेश वळसे यांनी केली.
याबाबतची फिर्याद पोलीस नाईक राजेश ठाकूर यांनी दिली. आरोपी अनिल वसंत राठोड रा. दरेगाव ह. मु. शास्त्रीनगर जवळा बाजार, अविनाश शिवाजी चोपडे रा. भाग्यनगर वसमत, आकाश शंकर ठोंबरे रा. रांजोना ता. वसमत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.