लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शालेय गणवेशाचा ४ कोटी २२ लाख ६७ हजार रूपयांचा निधी पाच गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केला आहे. आता ‘समग्र शिक्षा अभियानात हा लाभ दिला जाणार असून गणवेश वेळेवर मिळणार आहेत. तर वाढीव तरतुदीनुसार विद्यार्थ्यांना दोन गणवेशांचे ६०० रूपये मिळणार आहेत.शासनाकडून आता सर्व शिक्षा अभियान, राष्टÑीय माध्यमिक शिक्षा अभियान व शिक्षकांचे शिक्षण या केंद्र पुरस्कृत योजनांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. २०१८-१९ या आर्थिक वर्षांपासून समग्र शिक्षा अभियान ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. १० मे २०१८ रोजी प्रकल्प मान्यता मंडळाच्या बैठकीत राज्याच्या वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रकास शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता समग्र शिक्षा अभियानअंतर्गत पहिली ते आठवीतील शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळेतील सर्व मुली तसेच अनुसूचित जमातीतील मुले, दारिद्र्य रेषेखालील पालकांच्या मुलांना गणवेश वाटप केले जाणार आहेत.सर्व शिक्षा अभियानअंतर्गत २०१८-१९ मोफत गणवेश वाटप योजनेतील पात्र विद्यार्थ्याची तालुकानिहाय संख्या हिंगोली १५ हजार २५३, सेनगाव १४ हजार ३१६, वसमत १४ हजार ४६७, कळमनुरी १४ हजार ६०७ तसेच औंढा नागनाथ ११ हजार ८०२ एकूण ७० हजार ४४५ अशी आहे. तालुका स्तरावरून सर्व शिक्षा अभियानकडे गणवेशपात्र विद्यार्थ्यांचा अहवाल सादर करण्यात आला आहे.आता पुढील प्रक्रिया शिक्षण विभागाकडून आॅनलाईन राबविण्यात येणार आहे. सर्व शिक्षा अभियान, राष्टÑीय माध्यमिक शिक्षा अभियान व शिक्षकांचे शिक्षण या केंद्र पुरस्कृत योजनांचे एकत्रीकरण करून समग्रतंर्गत प्रक्रिया पार पडेल.डीबीटीनुसार लाभार्थ्याच्या आधार संलग्नित बँक खात्यावर दोन गणवेशाची रक्कम जमा केली जाईल. तर पालकांनी पाल्यांचे दोन गणवेश खरेदीची पावती शाळेच्या मुख्याध्यापकाकडे देणे बंधनकारक आहे. विशेष म्हणजे लाभार्थी विद्यार्थी व त्याची आई यांच्या संयुक्त बँक खात्याचा आग्रह न धरताविद्यार्थ्याचे वडील किंवा अन्य पालकांच्या वैयक्तिक आधार संलग्नित खात्यावर रक्कम वर्ग करता येईल. गणवेशाचा रंग, प्रकार याबाबी संबंधित शाळेच्या शा.व्य.स. स्तरावरूनच ठरविण्यात येईल. गणवेश अंमलबजावणीचे सर्व अधिकार समितीला आहेत.एकही लाभार्थी गणवेशापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचना सीईओ एच. पी. तुम्मोड यांनी दिल्या. शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनीही गटशिक्षणाधिकाºयांन गशिअंना कडक सूचना दिल्या.यापूर्वी सर्व शिक्षा अभियान अंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांना दोन गणवेशासाठी ४०० रूपये देण्याची तरतूद होती. यात आता बदल करून गणवेशाच्या रक्कमेत वाढ करण्यात आली आहे. समग्र शिक्षा अभियानअंतर्गत आता दोन गणवेशासाठी ६०० रूपये याप्रमाणे लाभाची रक्कम दिली जाणार आहे. डीबीटीनुसार विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी करण्याच्या सूचना आहेत.
‘समग्र’मुळे गणवेश मिळणार वेळेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 1:50 AM