कुरूंदा : टिपू सुलतान हा स्वतंत्र्यासाठी शहीद होणारा राजा होता. त्यांच्या कार्यकाळात वैज्ञानिक संशोधन, भूगर्भशास्त्र, उद्योग, कृषी विकासात्मक कार्याला यशस्वीपणे चालना मिळाली होती. तर राष्ट्रीय एकात्मतेची प्रेरणा देणारे, देशाला सुपर पॉवर बनवणारी विचारधारा त्यांची होती, असे मत टिपू सुलतान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष शेख सुभान अली यांनी कुरुंदा येथे व्यक्त केले.टिपू सुलतान जयंतीनिमित्त त्यांचे व्याख्यान झाले. यावेळी सतीश महागावकर, बाबूराव दळवी, अशोक दळवी, उपसरपंच प्रभाकर आडणे, फौजदार शंकर वाघमोडे , नारायण अवसरमल्ले, सय्यद इमरान , लतीफ कुरेशी, शेख ताहेर, शेख आमीर आदीउपस्थिती होती. शेख म्हणाले, टिपू सुलतान यांनी शेतीपूरक उद्योग सुरू केले. जहागीरदारी संपवली व कर्मचारी नेमले. शेतकऱ्यांसाठी जोड व्यवसाय म्हणून रेशीम उद्योगास चालना दिली. इंग्रजा विरूद्ध स्वातंत्र्यासाठी स्वाभिमानाने शहीद होणारा एकमेव राजा म्हणून ते ओळखल्या जातात.यशस्वीतेसाठी सय्यद आयाज , शेख समीर , सलमान पठाण , शेख अलीम , सय्यद साद आदीसह टिपू सुलतान ब्रिगेडचे सदस्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन जय लोखंडे यांनी केले तर आभार सलमान पठाण यांनी मानले.
‘टिपू सुलतान यांचे विचार विकासाला चालना देणारे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2018 1:02 AM