कळमनुरी तहसील कार्यालय परिसरात, पंचायत समिती, जिल्हा परिषद प्रशाला, नगरपरिषद कार्यालयाजवळ मोटरसायकली व इतर वाहने लावण्यात आली. या परिसरात नागरिकांच्या झुंडीच्या झुंडी दिसत होत्या. तहसील कार्यालयाच्या आतही उमेदवार व त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली होती. उमेदवारांसाेबत समर्थक येत असल्याने गर्दी होत आहे. हिंगोली - नांदेड मुख्य रस्त्यावर वाहनांची वर्दळ होती. सकाळपासूनच पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. हॉटेल व मिठाईची दुकाने, पानटपरी आदी दुकानांवर चांगलीच गर्दी दिसून आली. उमेदवार आपले नामनिर्देशनपत्र बरोबर आहे की नाही, हे पाहण्यात व्यस्त होते. कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात काहीजण व्यस्त दिसले. ५० टक्के जागा महिलांसाठी आरक्षित असल्याने महिलांचीही गर्दी दिसून आली. सकाळी नऊ वाजल्यापासूनच तहसील कार्यालय परिसरात गर्दी होती. यावेळी मात्र सामाजिक अंतर पालनाचा फज्जा उडालेला होता. मास्कचाही वापर नागरिक करीत नसल्याचे दिसून आले. दिवसभर नागरिकांची तहसील कार्यालय परिसरात चांगलीच गर्दी होती. पोनि रणजित भोईटे, फौजदार सिद्दिकी, तसेच अनेक होमगार्ड यांनी चोख बंदोबस्त ठेवला.
फाेटाे नं. ०२