लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात १५ सप्टेंबर ते २ आॅक्टोबरदरम्यान प्रत्येक गावात श्रमदानातून ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी ५६३ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक केली असून अनुपस्थित राहिल्यास एक दिवसाचे वेतन कापण्यात येणार आहे.या उपक्रमाबाबत जिल्हाधिकारी अनिल भंडारी, सीईओ एच.पी.तुम्मोड यांनी विविध सूचना दिल्या आहेत. यात स्थानिक लोकप्रतिनिधी, स्थानिक स्वराज्या संस्था व स्वयंसेवी संस्थानी सक्रिय सहभाग घ्यावयाचा आहे. प्रत्येक ग्रा.पं.त स्वच्छता दिंडी काढावी, उघड्यावर जाण्यापासून मुक्तीसाठी शौचालय खड्ड्यांचे लाईन आऊट द्यावे, प्रत्येक कुटुंबात जागृती करावी, ग्रामसभा, डिजिटल रथ, कलापथक आणि निगराणी समितीमार्फत शौचालय वापराकडे लक्ष द्यावे, शाळा, अंगणवाडी भेटीतून फेरी काढावी, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात स्वच्छता अभियान राबवावे, बाजाराच्या ठिकाणी जागृती करावी, शाळा, महाविद्यालयात निबंध, वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करावे, गणेश मंडळांनीही एक दिवस स्वच्छता उपक्रम राबविण्यात यावा, अशा सूचना दिल्याचे प्रभारी उपमुकाअ ए.एल. बोंद्रे यांनी सांगितले.
आजपासून ‘स्वच्छता ही सेवा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 11:43 PM