लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : अनंत चतुर्दशी २३ सप्टेंबर रोजी गणरायाला मोठ्या भक्तीभावाने निरोप देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १२०४ गणपती मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे. विसर्जनाच्या दिवशी कडेकोट पोलीस बंदोबस्त असणार आहे. शिवाय पोलीस अधीक्षक कार्यालयाचे ६७ सीसीटीव्ही व इतर कॅमेऱ्याद्वारे बारिक -सारिक हालचालींवर पोलिसांची करडी नजर असणार आहे. पोलीस अधीक्षक यांच्यासह ५२ पोलीस अधिकारी व ७५० पोलीस कर्मचाºयांचा फौजफाटा तैनात असणार आहे.गणेश विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. १ हजार २५५ पैकी रविवारी १ हजार २०४ गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. विसर्जनस्थळ व मिरवणूक मार्गाची पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी प्रत्यक्षपणे पाहणी केली. यावेळी न. प. मुख्याधिकारी रामदास पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने तसेच पोनि उदयसिंग चंदेल व वाहतूक शाखेतील अधिकारी उपस्थित होते. तसेच औंढा नागनाथसह इतर ठाण्यांना भेटी देऊन बंदोबस्त संदर्भात संबधित अधिकाºयांना सूचनाही दिल्या.हिंगोली शहरातील ३६ गणपती मूर्तींचे विसर्जन २४ सप्टेंबरला करण्यात येणार आहे. नवसाला पावणारा म्हणून ओळख असलेल्या श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी राज्य- परराज्यातून लाखोंच्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे दर्शनासाठी भाविकांची गर्दी लक्षात घेता गणरायाला सोमवारी निरोप देण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली.श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती दर्शनासाठी भाविकांच्या रांगा४हिंगोली येथे श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिराकडे दर्शनासाठी जाणाºया भाविकांच्या रांगा लागत आहेत. अनंत चतुर्दशीच्या दिवशी दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविकांच्या रांगा लागतात. त्यामुळे पोलीस प्रशासन व संस्थानकडून नियोजन करण्यात आले आहे. येणाºया भाविकांना शिस्तीत रांगेत उभे राहून दर्शन व्हावे, या उद्देशाने नियोजन करण्यात आले आहे. बाहेरगावावरून येणाºया भाविकांच्या वाहनांसाठी रामलीला मैदान येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.२ लाख ५१ हजार मोदकांचे वाटप होणार आहे. भाविकांची दर्शनासाठी शनिवारी अलोट गर्दी झाली होती.मोदक वाटप सकाळी ९.३० वाजता; भाविकांसाठी भोजनाची सुविधा४नवसाला पावणारा गणपती म्हणून हिंगोली येथील श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीची ओळख सर्वदूर आहे. राज्य परराज्यातून गणरायाच्या दर्शनासाठी व नवस फेडण्यासाठी भाविक हिंगोलीत येतात. २३ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी ६ वाजता कावड निघणार आहे. तर सकाळी ९.३० वाजता नवसाचे मोदक वाटपास प्रारंभ करण्यात येणार आहे. दर्शनासाठी येणाºया भाविकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेत ठिकठिकाणी सभामंडप तसेच रांगेत दर्शनासाठी सोडले जात आहे. शहात जागो-जागी विविध गणेश मंडळातर्फे महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.व्हिडीओ शूटिंग४जिल्ह्यात गणपती विसर्जन भक्तीमय वातावरणात पार पडणार आहे. त्यानुषंगाने मिरवणूक मार्ग व विसर्जनस्थळाचा पोलीस प्रशासनाकडून व्हीडीओ शूट केला जाणार आहे. कोणीही अनुचित प्रकार करणार नाही यावर करडी नजर ठेवण्यात येत आहे. शिवाय जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत २ किंवा ४ व्हिडीओ शूटींग करण्यासाठी व्हिडीओ कॅमेरे उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जिल्हाभरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.जिल्ह्यतील पोलीस बंदोबस्त४अनंत चतुर्दशीला गणरायाला निरोप दिला जाणार आहे. विसर्जनाच्या दिवशी पोलीस प्रशासकनाडून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक तसेच ५२ पोलीस अधिकारी, ७५० पोलीस कर्मचारी, एसआरपीएफ कंपनी १, ३५० होमगार्ड, ५० नव शिकाऊ पोलीस कर्मचारी, आरसी प्लाटून २, बॉम्बशोधक पथक व एटीएसचे १ पथक अशी पोलीस प्रशासनाची फौज आज जिल्हाभरात तैनात असणार आहे. अशी माहिती पोनि अशोक मैराळ यांनी दिली. शांततामय वातावरणात विसर्जनाचे आवाहन पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी केले आहे.४गणेश विसर्जनाच्या दिवशी कडेकोट पोलीस बंदोबस्त असणार आहे. पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांनी विसर्जनाच्या दिवशी पोलीस अधिकाºयांनी कोण-कोणती खबरदारी घ्यायला हवी याबाबत मार्गदर्शन केले. हिंगोली शहरातून पोलिसांनी पथसंचलन करून मिरवणूक मार्गाची पाहणी केली. यावेळी हिंगोली शहरातील इंदिरा गांधी चौक, मेहराजुलूम मशीद, गोदावरी हॉटेल, पोळा मारोती व गांधी चौक येथून पथसंचलन केले. यावेळी पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी हजर होते.
आज हजारो गणपती मूर्तींचे होणार विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2018 12:12 AM