लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मराठवाड्यात दुष्काळी भागातील पाहणीसाठी येत असलेले विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे १४ नोव्हेंबर रोजी हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.विखे हे सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास हिंगोली येथे हेलिकॉप्टरने येणार आहेत. त्यानंतर ५.३0 वाजता ते औंढा तालुक्यातील पिंपळदरी येथे खा.राजीव सातव व आ.संतोष टारफे यांच्यासमवेत दुष्काळी भागाची पाहणी करणार आहेत. यावेळी ते शेतकºयांशीही चर्चा करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता औंढा येथे कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. त्यानंतर सोयीनुसार हिंगोलीकडे प्रयाण करणार आहेत. १५ रोजी सकाळी ८.५0 वाजता औंढा तालुक्यातील नागेशवाडी येथे आत्महत्याग्रस्त शेतकरी शिवाजी कराळे यांच्या कुटुंबियांची भेट घेवून सांत्वना देणार आहेत. त्यानंतर ९.३0 वाजता चोंडी शहापूर येथे नाला सरळीकरणाच्या कामाची पाहणी करून हिंगोलीला परततील. येथून हेलिकॉप्टरने प्रयाण करतील.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांचा आज दौरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 12:57 AM