शहरं
Join us  
Trending Stories
1
मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
2
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
3
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
4
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
5
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
6
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा
7
सरवणकरांच्या कार्यालय उद्घाटनाला आशिष शेलारांची दांडी; भाजपा अमित ठाकरेंच्या पाठिशी?
8
Tax Savings in FY25: पोस्ट ऑफिसची 'ही' जबरदस्त स्कीम वाचवते तुमचा मोठा टॅक्स; कमाईचीही गॅरेंटी, पाहा डिटेल्स
9
"मशालसोबत विशाल अन् हातात घड्याळ"; विशाल पाटील-जयंत पाटील यांच्यात जुगलबंदी!
10
'ते' विधान धनगर समाजाचं अपमान करणारं; सुनील शेळकेंविरोधात बापू भेगडे आक्रमक
11
अर्जुन कपूर या गंभीर आजाराशी करतोय सामना, म्हणाला- "शरीराचं होतंय नुकसान"
12
नाशिकमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडणार; सभेसाठी १ लाख लोक जमवण्याचे महायुतीचे नियोजन
13
सलमान खान अन् लॉरेन्स बिश्नोईवर गाणं लिहिणाऱ्यालाही आली धमकी, म्हणाले, "हिंमत असेल तर..."
14
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
15
शरद पवार गटाची फाइट अजित पवार अन् भाजपशी, अनेक मतदारसंघांत थेट सामना; तर काही ठिकाणी पाठिंबा
16
आदित्य, अमित ठाकरे यांच्यामुळे चुरस आणखी वाढली; कोणाचे पारडे राहणार जड? चार मतदारसंघांत मनसेचे महायुती, मविआला आव्हान
17
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका; पुन्हा MCLR मध्ये वाढ, होमलोनचा EMI वाढणार
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: यंदाच्या निवडणुकीत राज्यातील ३५ मतदारसंघात अल्पसंख्याक मतदार ठरणार निर्णायक
19
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
20
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?

हिंगोली जिल्ह्यात दोन वर्षांत अपघातात २७० जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 12:14 AM

जिल्हाभरात विविध भागातील रस्त्यांची दुरुस्ती जरी झाली असली तरी त्या रस्त्याचा साईड भरणाच केलेला नाही. त्यामुळे दिवसागणिक अपघात होत आहेत. दोन वर्षात २७० जणांचे बळी गेले आहेत. एका दिवसाला दोन ते तीन अपघात आणि एकाचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव आकडेवारीवरुन पुढे आले आहे

ठळक मुद्दे नियमाचे पालन न करणे, रस्त्यावरील खड्डे, मोबाईल, मद्यपान इ. चा फटका

संतोष भिसे ।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्हाभरात विविध भागातील रस्त्यांची दुरुस्ती जरी झाली असली तरी त्या रस्त्याचा साईड भरणाच केलेला नाही. त्यामुळे दिवसागणिक अपघात होत आहेत. दोन वर्षात २७० जणांचे बळी गेले आहेत. एका दिवसाला दोन ते तीन अपघात आणि एकाचा मृत्यू झाल्याचे धक्कादायक वास्तव आकडेवारीवरुन पुढे आले आहे‘वाहने सावकारास चालवा’, मद्यपान करुनये, ‘अतिघाई संकटात नेई’, ‘मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक’, ‘नियम पाळा, अपघात टाळा’ यासारखे वाहनचालकांना संदेश देणारे फलक रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात लावलेले आहेत. परंतु त्यांचा खरोखरच चालकांकडून वापर होतो का? हाही एक गंभीर प्रश्नच आहे. त्यामुळे ते फलक केवळ शोभेचीच वस्तू बनलेले आहेत. आता तर चक्क अपघातस्थळी रबर स्टेबर टाकलेले आहे. तेथे वाहन येताच चालक खडबडून जागे होऊन आपल्या वाहनावर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे तरी निदान तेथे अपघाताची आकडेवारी घटली आहे. आजही भरधाव वेगाने वाहने चालवणाºयांची संख्या कमी नाही. कधी - कधी तर अचानक वन्य प्राणीही रस्त्यावर आडवे आले तर ब्रेक दाबला तर अपघात टळू शकतो मात्र असे क्वचित ठिकाणीच होते.त्यामुळे रस्त्यावर आडवे आलेल्या वन्य प्राण्यांमुळेही अनेकदा अपघात घडले आहेत.विशेष बाब म्हणजे रस्ते बनविलेले असले तरीही त्याचा साईड भरणाच केला नसल्याने वाहनाचा रस्त्याच्या कडेला जराही तोल गेला की, वाहन उलटत आहेत.विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी हिंगोली - नांदेड महामार्गावर अपघात होण्याचे प्रमाण सर्वाधिक जास्त आहे. रस्त्याच्या दोन्हीही बाजूला एक ते दीड फूट खोली निर्माण झाल्यामुळे चालक वाहन खाली उतरवित नाहीत.अचानक उतरविलेच तर ते उलटल्याशिवाय राहत नाही. तसेच मद्यपान करुन वाहन चालविणाºयांचीही संख्या कमी नाही. मद्यपान केल्यानंतर बेदरकार वाहने चालविल्याने विशेषत: दुचाकीस्वार अनेकदा अपघातात सापडतात.जनजागृती : महामार्गावर सर्वाधिक नोंदपोलीस प्रशासनासह विविध सामाजिक संस्थाकडून अपघात टाळता यावेत, यासाठी वेळोवेळी रस्ता सुरक्षा अभियान राबविले जाते. या अभियानातून अनेकदा वाहन चालविताना घ्यावयाची काळजी नियमाचे पालन केल्यास अपघात कसा टाळता येऊ शकतो आदी लहान-सहान बाबी वाहनचालकांच्या लक्षात येण्यासाठी समजावून सांगितल्या जातात. मात्र मोजकेच चालक वेळोवेळी सांगितलेल्या नियमांचे पालन करतात. इतर पालनच करीत नसल्याने खºया अर्थाने जनजागृती होत नसावी की चालकच समजून घेत नसावेत? असाही एक प्रश्न आहे.

साबांचे दुर्लक्षजिल्ह्यातील खड्डे अद्याप साबांने दुर्लक्ष केलेले नाहीत. त्यामुळे आजही रात्री - अपरात्री प्रवास करणारी व्यक्ती घरापर्यंत पोहोचेल की नाही ? याचा भरोसा नाही. एका ठिकाणावरुन दुसºया ठिकाणी निघालेल्या व्यक्तीच्या घरची मंडळी सतत संपर्कात राहत असल्याचेही चित्र आहे.

बसचेही अपघातदोन महिन्यात एसटी बसचेही मोठ्या प्रमाणात अपघात झाले आहेत. यामध्येही काही प्रवाशांना जिव गमवावा लागला आहे. सर्वच अपघातांची संख्या कमी होण्यासाठी चांगल्या रस्त्यांसोबतच चालकही जागरुक असले पाहिजे.