शहरं
Join us  
Trending Stories
1
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
2
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
3
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
4
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
5
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
7
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
8
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
9
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
10
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
12
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
13
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
14
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
15
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
16
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
17
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
18
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
19
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
20
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान

व्यापारी, औषधी विक्रेत्यांचा हिंगोली जिल्ह्यात बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 11:24 PM

विविध मागण्यांसाठी देशभरात औषधी विक्रेते व व्यापाऱ्यांनी बंद पुकारला होता. जिल्ह्यात बंदला प्रतिसाद मिळाला असून हिंगोलीसह, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव व आखाडा बाळापूर येथे बंदमध्ये औषधी विक्रेते व व्यापारी सहभागी झाले होते. दिवसभर दुकाने बंद ठेवण्यात आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : विविध मागण्यांसाठी देशभरात औषधी विक्रेते व व्यापाऱ्यांनी बंद पुकारला होता. जिल्ह्यात बंदला प्रतिसाद मिळाला असून हिंगोलीसह, कळमनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव व आखाडा बाळापूर येथे बंदमध्ये औषधी विक्रेते व व्यापारी सहभागी झाले होते. दिवसभर दुकाने बंद ठेवण्यात आली होती.देशात व राज्यात सर्रासपणे बेकायदेशीररित्या इंटरनेट फार्मसीच्या माध्यमातून आॅनलाईन औषधी विक्रीच्या विरोधात अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने बंदचे आहवान केले होते. त्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यात औषधी विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग घेतला. तर विदेशी कंपन्या पारंपरिक व्यापर पद्धती समाप्त करण्याच्या उद्देशाने थेट ग्राहकांना फोनवरच घरो-घरी जाऊन साहित्य पोहोचविणार आहेत. त्यामुळे सरकारने विदेशी कंपन्यांना आवश्यक नियम लागू करावेत, रिटेल, एफडीआय आणि ई-कॉमर्स पॉलिसी दिवाळीपूर्वी तयार केली जावी यासह विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी हिंगोली जिल्हा व्यापारी महासंघातर्फे दुकाने बंद ठेवून सहभाग नोंदविण्यात आला.व्यापारी महासंघातर्फे सादर केलेल्या निवेदनावर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रमेशचंद्र बगडिया, लक्ष्मीकांत गुंडेवार, रत्नदीपक सावजी, मुरली पांडे, शामसुंदर मुंदडा, सुनील माणका, जेठानंद नैणवाणी, विजय हवालदार, पंकज अग्रवाल, कंदी आदी व्यापाºयांच्या स्वाक्षºया आहेत.तर औषधी विक्रेत्यांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनावर कुशल जैन, प्रमोद मुंदडा, संतोष बाहेती, हंसराज गनवाणी, दीपक धूत, प्रवीण बगडिया, विजय मुधोळ, राजेश बालदी, सुभाष काबरा, आदींच्या स्वाक्षºया आहेत.सेनगावात कडकडीत बंद४सेनगाव : आॅनलाईन औषधी विक्री विरोधात केमिस्ट असोसिएशनचा वतीने पुकारलेल्या बंदला सेनगाव शहासह तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळाला. सर्व औषधी दुकाने दिवसभर बंद होती. औषधी दुकानदाराचा राज्यव्यापी बंदला प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व औषधी दुकाने बंद होती. त्यामुळे रुग्णांची गैरसोय झाली. पानकरेगाव येथे सकाळपासून औषधी दुकाने बंद ठेवली होती. औैषधी विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग नोंदविला होता.औंढा नागनाथ येथे कडकडी बंद४औंढा नागनाथ : इफार्मसीविरोधात पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात औंढा नागनाथ येथील औषधी विक्रेत्यांनी आपापली मेडिकल बंद ठेवून संपामध्ये सामील झाले होते. त्यामुळे रुग्णांना शासकीय रुग्णालयाचाच आधार होता. आजच्या डिजिटल प्रणालीमुळे ई-फार्मसीद्वारे रुग्णांना घर बसल्या कमी किमतीत औषधे सहज उपलब्ध होत आहेत. त्यामुळे औषधी दुकानावर न जाता विविध ई - साईटवरून औषधी मागविणाºयांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आह. केंद्र शासनसुद्धा ईफार्मसीबाबत सकारात्मक असल्यामुळे देशातील फार्मासिस्टकडून याविरुद्ध पुकारलेल्या संपात औंढा नागनाथ येथील औषधी दुकाने दिवसभर बंद ठेवली होती. ईफार्मसीद्वारे औषधी मागविल्यास रुग्णांच्या जीवाला धोका पोहोचू शकतो, अशी भीती फार्मासिस्ट संघाकडून व्यक्त होत आहे. औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णांना मिळायला हवीत, असे मत येथील औषधी विक्रेत्यांचे आहे. इंटरनेट फॉर्मसी माध्यमातून आॅनलाईन औषध विक्री व ई-पोर्टलबाबत शासनाच्या सकारात्मक असलेल्या भूमिकेविरोधात शुक्रवारी अखिल भारतीय औषधी विक्रेते संघटनेने पुकारलेल्या बंदमध्ये दुकाने बंद ठेवून सहभाग घेतला.वसमत येथे बंदला अभूतपूर्व प्रतिसाद४वसमत : व्यापाºयांनी पुकारलेल्या बंदला वसमतमध्ये अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. वसमतमध्ये सर्व व्यापारी प्रतिष्ठान कडकडीत बंद राहिले. बंदमुळे ग्रामीण भागातून आलेल्यांची गैरसोय होऊ नये, म्हणून व्यापारी महासंघाच्या वतीने दिवसभर खिचडी व चहापाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. भारत बंदच्या आवाहनास वसमतमध्ये सर्व व्यापारी संघटनांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. झेंडा चौकात सर्व व्यापारी एकत्र जमले होते. रॅलीद्वारे उपविभागीय अधिकारºयांना निवेदन देण्यात आले. बंददरम्यान शहरातील पानटपरीपासून सर्व मोठमोठी व्यापारी प्रतिष्ठाने कडकडीत बंद राहिली. दिवसभर बंद पाळण्यात आला. व्यापारी महासंघाच्या वतीने पुकारलेल्या बंदला पहिल्यांदाच अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. बंदमुळे नागरिक व ग्रामीण भागातील आलेल्याची गैरसोय होऊ नये, यासाठी झेंडा चौकात दिवसभर पाणी, चहा व नाश्त्याची व्यवस्था केली होती. निवेदनावर व्यापारी, महासंघाचे अध्यक्ष सुभाष लालपोतू, नवीनकुमार चौकडा, मन्मथआप्पा बेले, दिपक कुल्थे, भारत स्वामी, अशोक पवार, लक्ष्मीकांत कोसलगे, संजय पवार, नरेंद्र बोबेडा, अनील पातेकर, भगवान जवळेकर, नागनाथ कोम्पलवार, बालासाहेब महागावकर, राजेंद्र लालपोतू, दीपक जैस्वाल, बसंत चेपूरवार, राजेंद्र काबरा, एस.के. पाशा, गजानन कापूसकरी, कन्हैय्या शहा, सागर दलाल, राधेश्याम मंत्री, शेख महेबूब, पाशा बेग, अशरफ भंगारवाला, राजू अंबेकर, उमेश काळे, सुमित दलाल, पंडित तिडके, नंदू गोटलवार, आशिष दलाला, उबेद खानसाब, शिंदे, शशिकांत कोसलगे, सत्तार शेख, सत्तार शेख, म. गौस, शिवाजी बाबूराव रोकडा, रमेश रागल्ला, धनू मानधेम आदींची उपस्थिती होती. व्यापारी महासंघाच्या बंदला नगराध्यक्ष श्रीनिवास पोराजदार, माजी नगराध्यक्ष शिवदास बोड्डेवार, अ. हफीज अ. रहेमान, अजगर पटेल, शिवाजी अलडिंगे, विष्णू बोचकरी, भगवान कुदाळे, धनंजय गोरे आदी पदाधिकाºयांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.कळमनुरीतही बंदला प्रतिसाद४कळमनुरी : येथे मेडिकल औषधी आॅनलाईनच्या निषेधार्थ शहरातील व्यापाºयांनी आपले व्यवहार बंद ठेवत भारत बंदला पाठिंबा दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकाºयांमार्फत निवेदन देण्यात आले. निवेदनावर व्यापारी महासंघाचे नंदकिशोर तोष्णीवाल, चंद्रकांत देशमुख, मो.तन्वीर मो. जुबेर, नंदकिशोर सारडा, अविनाश बुर्से, नरेंद्र रेखावार, रामू सवने, सुहास गुंजकर, गोकुळ तोष्णीवाल, जावेद पठाण, मो.साजेद, नारायण शिंदे, अरूण वाढवे, श्रीराम सुरूशे, गोविंद सारडा, विश्वंभर सूर्यवंशी, महेश अग्रवाल, उदय मेहता, उमेश गोरे, संतोष रूपेश मांडवगडे, गुड्ड बुर्से, दिलीप साकळे, सौरभ साकळे आदींसह मोठ्या प्रमाणात या निवेदनावर व्यापारी बांधवांच्या स्वाक्षºया आहेत. तसेच मेडिकल असोसिएशनच्या वतीनेसुद्धा बंद ठेवण्यात आला. नंतर मेडिकल असोसिएशनच्या वतीने निवेदन देण्यात आले. बंददरम्यान पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :HingoliहिंगोलीMorchaमोर्चा