शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

रास्तारोकोमुळे वाहतूक ठप्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 12:13 AM

बाळापूर ठाण्यातील पोलीस अधिकारी असभ्य भाषा वापरत अरेरावी करत असल्याच्या निषेधार्थ आखाडा बाळापूर येथील व्यापारी, ग्रामस्थ व सर्वपक्षीय नेते, पदाधिकाऱ्यांनी नांदेड-हिंगोली महामार्गावर दीड तास रास्तारोको आंदोलन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कआखाडा बाळापूर : बाळापूर ठाण्यातील पोलीस अधिकारी असभ्य भाषा वापरत अरेरावी करत असल्याच्या निषेधार्थ आखाडा बाळापूर येथील व्यापारी, ग्रामस्थ व सर्वपक्षीय नेते, पदाधिकाऱ्यांनी नांदेड-हिंगोली महामार्गावर दीड तास रास्तारोको आंदोलन केले. बाळापुरची व्यापारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. ‘त्या’ अधिकाºयाची तातडीने बदली करून पोलिसाची दहशत संपवावी, या मागणीचे निवेदनही आंदोलकांनी दिले.या प्रकरणी पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आखाडा बाळापूर येथील मराठवाडा चौकात दुर्गादेवीची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. या सार्वजनिक दुर्गा देवीच्या लगत काहीजण जुगार खेळत असल्याची तक्रार फोनद्वारे पोलिसांना मिळाली. १३ आॅक्टोबर रोजी रात्री १०.२० वाजता त्यानुसार पोनि व्यंकटेश केंद्रे यांच्या आदेशावरून सपोनि ओमकांत चिंचोलकर व कर्मचारी तेथे पोहोचले. त्यावेळी तेथे १५ ते १६ जण जुगार खेळत असल्याचे आढळले. पण पोलिसांना पाहताच काहीजण पळाले तर त्यातले आठजण पोलिसांना सापडले. त्यांना पकडून ठाण्यात आणण्यात आले. जुगाराचे साहित्य व रोख रक्कम जप्त केली. तोपर्यंत ठाण्यात काही व्यापारी व ग्रामस्थ आले. हे अट्टल जुगारी नाहीत तर मंडळ पदाधिकारी असून मनोरंजन म्हणूत ते खेळत असल्याचे सांगत होते. त्यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे तेथे आले. त्यावेळी सपोनि ओमकांत चिंचोलकर व बोंढारे यांच्यात शाब्दीक बाचाबाची झाली. या शाब्दीक खडाजंंगीनंतर ठाण्यात वातावरण तापले. पोनि केंद्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकिरण काशीद यांनी व्यापारी, ग्रामस्थ यांच्याशी उत्तररात्रीपर्यंत चर्चा केली. यावेळी सपोनि ओमकांत चिंचोलकर यांनी आरेरावीची, असभ्य भाषा वापरून दबंगिरी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. त्यानंतर पोलीस अधिकाºयांच्या दडपशाहीविरोधात १४ आॅक्टोबर रोजी सकाळी ९.३० वाजता बाळापूर येथील जुने बसस्थानकजवळ नांदेड-हिंगोली रोडवर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी व्यापारी, ग्रामस्थ व सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. संतप्त आंदोलकांनी चिंचोलकर मुर्दाबाद, चिंचोलकर हटाव, अशा घोषणा दिल्या. चिंचोलकर यांची बदली करा, अशा मागणीचे निवेदनही दिले. यावेळी आंदोलकांच्या भावना वरिष्ठांना कळविणार असल्याचे सांगून रास्तारोको आंदोलन संपविले. सपोनि ओमकांत चिंचोलकर यांच्या अरेरावीविरूद्ध व त्यांची तात्कार बदली करावी, या मागणीसाठी दिवसभर बाळापूरची व्यापारपेठ कडकडीत बंद होती. वाहतूक ठप्पमुळे वाहनांच्या लांबलचक रांगाच रांगा महामार्गावर लागल्या होत्या. यावेळी अनेकांची गैरसोय झाली.अशा आहेत प्रतिक्रीया...४बाळापूर येथील पोलीस अधिकारी चिंचोलकर हे असभ्य, ऊर्मट भाषा वापरून सर्वसामान्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या हुकुमशाही वर्तनापुढे आम्ही झुकणार नाही. लोकशाही पद्धतीने न्याय मागू, पोलिसांची हुकुमशाही चालू देणार नाही, त्यांनी जनतेचे सेवक म्हणून काम करावे मालक होण्याचा प्रयत्न करू नये अशी प्रतिक्रिया संजय बोंढारे यांनी दिली.४पोलीस ठाण्यात येऊन गोंधळ घातल्याप्रकरणी ११० जणांविरूद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाली. याबाबत पोनि केंद्रे यांनी थेट माहिती देण्याचे टाळत कायदेशीर कारवाई होणारच, अशी सूचक प्रतिक्रिया दिली.आठजणांविरूद्ध गुन्हा दाखल४ आखाडा बाळापूर येथील मराठवाडा चौकातील दुकानाचे बाजूस झन्ना-मन्ना जुगार खेळत असताना रंगेहात पकडले. जुगाराचे साहित्य व रोख ३३५८० रुपये जप्त केले. सपोनि ओमकांत चिंचोलकर यांच्या फिर्यादीवरून गजानन शंकरराव जाधव, राजू दयानंद गिरी, मंगेश भगवानराव दुर्गे, उत्तम भोजाजी धांडे, लक्ष्मण कोंडबाराव बोंढारे, शिवचरण विजयकुमार गोयंका, अजय सखाराम अग्रवाल, शाम मदन व्यवहारे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीPoliceपोलिस