लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालण्याची सवय असलेल्यांसाठी वाईट बातमी आहे. वाहतूक पोलिसांना आता कॅमरे देण्यात आले आहेत. त्यामुळे हुज्जत घालणारे आणि पोलीस यांच्यातील संवाद व्हिडिओसह रेकॉर्ड केला जाणार आहे.शहरातील वाहतूक पोलिसांच्या अंगावर आता डिजिटल कॅमेरे बसविण्यात आले आहेत. वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालणे आता चांगलेच महागात पडणार आहे. पोलीस अधीक्षक योगेश कुमार व वाहतूक शाखेचे सपोनि चिंचोलकर यांच्या संकल्पनेतून प्रायोगिक तत्त्वावर चार वाहतूक पोलिसांना बुधवारी कॅमेरे वाटप केले. हे कॅमेरे मुंबईहून मागविले आहेत. या कॅमेऱ्यांमध्ये २४ तास आॅडिओ व व्हिडिओ रेकॉर्डिंग होते. वाहतूक पोलिसांशी अनेकजण हुज्जत घालतात. आता या पोलिसांच्या अंगावरील कॅमेऱ्यांमुळे अनेकांना पोलिसांसोबत हुज्जत घालणे चांगलेच महागात पडणार आहे. तर नियम मोडून हुज्जत घालणाऱ्यांना कोर्टातसुद्धा जावे लागणार आहे. कायदा सर्वांसाठी समान आहे, कुणाचीही गय केली जाणार नाही असे चिंचोळकर यांनी सांगितले. नागरिक व पोलीस यांच्यातील संवाद मुद्रित करून त्याचा वापर केला जाणार आहे. केवळ एक स्वीच दाबून रेकॉर्डिंग सुरू करणे या कॅमेºयांमुळे शक्य होते.वाहतूक नियमांचा भंग केल्यास जेव्हा एखाद्याला दंड केला जातो. तेव्हा उलट प्रश्न विचारणे, शिवीगाळ करणे असे प्रकार घडत असल्याच्या वाहतूक पोलिसांच्या तक्रारी होत्या. अशा नागरिकांवर अंकुश ठेवण्यासाठी हे कॅमरे देण्यात आले आहेत, अशी माहिती वाहतूक शाखेचे सपोनि चिंचोळकर यांनी दिली. कॅमेºयामधील रेकॉर्डिंगच्या आधारावर पोलीस नंतर सबंधितावर गुन्हेही दाखल करू शकतात. तर या कॅमºयाचा आणखी एक फायदा म्हणजे पोलिसांचीही लोकांबरोबरची वागणूक यात टिपली जाणार असल्यामुळे पोलिसांवरही अंकुश राहणार आहे. वाहतूक पोलिसांना कॅमरे देण्याची पद्धत अनेक युरोपीय राष्ट्रात आहे.आज झाले वितरणपोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांच्या हस्ते वाहतूक शाखेच्या चार कर्मचाºयांना कॅमेरे वितरित करण्यात आले. यावेळी सपोनि चिंचोळकर यांचीही उपस्थिती होती. याचा योग्य वेळी वापर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
वाहतूक पोलिसांशी वाद पडणार महागात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:09 AM