लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : महाराष्ट्र शासनातर्फे घेतल्या जाणाऱ्या अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, औषधनिर्माण शास्त्र तसेच कृषी विज्ञान व कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञान या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशपूर्व चाचणी (एमएचटी-सीईटी-२0१८) परीक्षेसाठी आयोजित प्रशिक्षणासाठी गैरहजर ६४ अधिकारी-कर्मचाºयांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. दुसºया प्रशिक्षणास गैरहजर राहिल्यास कारवाईचा इशारा दिला.१0 मे २0१८ रोजी ही परीक्षा होणार आहे. यासाठी हिंगोली जिल्ह्यात ३५६९ परीक्षार्थी आहेत. त्यांच्यासाठी १५ परीक्षा केंद्र निवडले आहेत. या केंद्रावर काम करणाºया अधिकारी-कर्मचाºयांचे प्रशिक्षण गुरुवारी आयोजित केले होते. मात्र त्याला उपकेंद्रप्रमुख ४, पर्यवेक्षक-२३ व समवेक्षक ३७ गैरहजर राहिले होते. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्याचा आदेश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिला आहे. जर ही मंडळी दुसºया प्रशिक्षणासाठीही गैरहजर राहिली तर गंभीर स्वरुपाची कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर डिजिटल डायरी, कॅलक्युलेटर, पुस्तके, पेपर्स, पेजर, मायक्रोफोन, मोबाईल फोन, कॅमेरा अंतर्भूत असलेली कोणत्याही प्रकारची साधने अथवा शासनाने अशा परीक्षेसाठी बंदी घातलेली कोणतीच साधने आणू नयेत, असे आवाहन केले आहे. तर परीक्षा कक्षात अशी साधने अथवा कॉपीचा प्रकार आढळून आल्यास संबंधित परीक्षार्थ्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.गैरहजेरीचे प्रमाण अधिकया परीक्षेसाठीच्या प्रशिक्षणासाठी नियुक्त केलेल्या अधिकारी व कर्मचाºयांपैकी बहुतांश जणांनी दांडी मारली. असाच प्रकार पुन्हा घडला तर परीक्षा कशी घ्यावी, असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जिल्हाधिकारी कडक धोरण अवलंबण्याची चिन्हे दिसत आहेत.
प्रशिक्षणाला ‘डुम्मा’; ६४ जणांना नोटिसा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 12:07 AM