जि.प. अध्यक्ष गणाजी बेले, सीईओ आर.बी.शर्मा, उपाध्यक्ष मनीष आखरे, सभापती महादेव एकलारे, फकिरा मुंडे, अतिरिक्त मुकाअ अनुप शेंगूलवार, उपमुकाअ डी.आर. माळी, डॉ.शिवाजी पवार, शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, नीलेश कानवडे यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते. आज आरोग्य विभागातील एएनएम ३, एमपीडब्ल्यू ५ व औषध निर्माता १ अशा ९ बदल्या झाल्या. पशुसंवर्धन विभागातील व्रणोपचारक १, सहायक पशुधन विकास अधिकारी १, पशुधन पर्यवेक्षकांच्या प्रशासकीय ४ तर विनंती ३ अशा ९ बदल्यांची प्रक्रिया झाली. शिक्षण विभागातील बदल्यांमध्ये १ केंद्रप्रमुख व २ विस्तार अधिकारी अशा तिघांच्या बदल्या झाल्या. ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील एका कनिष्ठ अभियंत्यांची बदली झाली. कृषी विभागातील दोन विस्तार अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. फक्त लघुसिंचन विभागातील एकाही कर्मचाऱ्याची बदली झाली नाही. उद्या बुधवारी जि.प.तील उर्वरित विभागांतील बदल्यांची प्रक्रिया पार पडणार आहे.
जिल्हा परिषदेत २४ जणांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 4:31 AM