लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मोंढ्यात रोजंदारीने काम करणाऱ्या महिलांना कामावरून काढून टाकले. त्यामुळे कृषि उत्पन्न बजार समिती हिंगोलीच्या मोंढ्यात काम करू द्यावे या मागणीसाठी २७ आॅगस्टपासून जिल्हाकचेरी समोर उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा शुक्रवारी सहावा दिवस होता. यातील सात उपोषणकर्त्या महिलांची बुधवारी प्रकृती खालावली होती. तापाने फणफणलेल्या उपाषणकर्त्या महिलांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. महिलांची आ. रामराव वडकुते यांनी भेट घेऊन विचारपूस केली.हिंगोली कृषि उत्पन्न बाजार समिती मोंढा परिसरात काम करणाºया महिला मागील काही महिन्यांपासून कामावर परत घ्यावे यासाठी उपोषण करीत आहेत. केले. परंतु तोडगा निघाला नाही. त्यामुळे जवळपास ५० महिला जिल्हा कचेरीसमोर उपोषणास बसल्या आहेत. मागील चाळीस वर्षांपासून या महिला कामगार मोंढ्यात तुटपुंज्या मोबदल्यावर काम करत. उपचारासाठी पारूबाई हानवते, लीलाबाई घोडे, शोभाबाई डाखोरे, गयाबाई कांबळे, मथुराबाई हातागळे, हरणाबाई गजभार, कौशल्याबाई देवकते या महिलांवर उपचार सुरू आहेत.कृऊबाचे आडमुठे धोरण...महिलांना कामावरून काढून टाकण्यात आले हे कृऊबाचे आडमठे धोरण आहे. महिलांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आ. वडकुते यांनी जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन मार्ग काढण्याची मागणी केली. तोडगा काढण्यासाठी व्यापारी तयार असतील तर कृऊबा व व्यापाºयांची संयुक्त बैठक घेऊ व मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करून असे आ. वडकुते यांना जिल्हाधिकाºयांनी सांगितले.
उपोषणकर्त्या महिलांवर उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 11:33 PM