लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : कर्तव्य बजावताना अनेक पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी प्राणाची आहुती दिली. त्या हुतात्म्यांचे स्मरणार्थ २१ आॅक्टोबर रोजी हिंगोली येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर शहीद पोलीस जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी पोलीस अधीक्षक योगेश कुमार, पोलीस उपअधीक्षक (गृह) सुजाता पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे, पोनि जगदीश भंडरवार, पोनि उदयसिंग चंदेल, पोनि अशोक मैराळ, पोनि सरदारसिंग ठाकूर, पोनि धुन्ने यांच्यासह पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कर्तव्य बजावताना प्राणाची आहुती दिलेल्या शहीद विरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.चिनी सैनिकांनी अचानक केला होता हल्ला...४लडाखमधील हॉटस्प्रिंग येथे २१ आॅक्टोबर १९५९ रोजी कडाक्याच्या थंडीच्या रात्री केंद्रीय राखीव दलाच्या भारत-चिन सीमेवर पहारा देणाºया एका तुकडीवर चीनी सैनिकांनी अचानक हल्ला चढविला होता. सदर हल्ल्यात या जवानांनी अत्यंत शौर्याने तोंड देऊन देशासाठी प्राणांचे बलीदान दिले. त्या सर्वांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी संपूर्ण देशभरात पोलीस स्मृतीदिनी दरवर्षी शहीद पोलीस अधिकारी व कर्मचाºयांचे स्मरण करण्यात येते.४१ सप्टेंबर २०१७ ते ३१ आॅगस्ट २०१८ या कालावधीत भारतात ४१४ पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी कर्तव्य बजावणातांना प्राणाची आहुती दिली. या शुरवीर शहिदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
प्राणाची आहुती देणाऱ्या शहीदांना श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 11:24 PM