खासदार राजीव सातव यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून या कार्यक्रमास प्रारंभ झाला. यावेळी आमदार तान्हाजीराव मुटकुळे, आमदार संतोष बांगर, माजी खा. शिवाजी माने, माजी आ. गजानन घुगे, माजी आ. संतोष टारफे, माजी आ. रामराव वडकुते, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, उपनगराध्यक्ष दिलीप चव्हाण, जि. प. उपाध्यक्ष मनीष आखरे, मिलिंद यंबल, शेख निहाल, सुधीरआप्पा सराफ, सुनील देवडा, जगजीतराज खुराणा, अनिल नेणवाणी, राम कदम, नंदकिशोर तोष्णीवाल, मनोज आखरे, सुमित चौधरी, विलास गोरे, पंकज अग्रवाल, मामूद बागवान, प्रशांत सोनी, हमिद प्यारेवाले, सुरेशअप्पा सराफ, खलील बेलदार आदींची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी मान्यवरांनी राजीव सातव यांच्यासमवेतच्या आठवणी जागवल्या. तसेच सातव यांच्यासारखा अल्पावधीतच देश पातळीपर्यंत झेप घेणारा नेता यापुढे होणार नाही. सुसंस्कृत व सौहार्दपूर्ण वागणारा नेता गमावला. हिंगोलीसारख्या ठिकाणी असे नेतृत्व अभावानेच उभे राहते. मात्र काळाने ते हिरावल्याच्या भावना व्यक्त केल्या. संवेदनशील मनाच्या या माणसाच्या मनात प्रत्येकाबद्दल आदराची भावना असायची. तर अनेकांनी आपल्या जडणघडणीत त्यांचा वाटा असल्याचेही खुल्या दिलाने मान्य केले, तर पक्षविरहित मैत्रीही जपून सातव यांनी सर्वांशी चांगले संबंध जोपासल्याचेही सांगितले.