लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : हमीभावाची खात्री, नांगरणी ते कापणीची कामे मग्रारोहयोतून करावी, शेतमजूरांना पेन्शन द्यावे आणि दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, असे ठराव घेण्यात आल्याची माहिती भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष ज्ञानोबा मुंढे यांनी दिली.हिंगोली येथील केमिस्ट भवनात २० आॅक्टोबर रोजी भाजपच्या किसान मोर्चाची कार्यकारिणी बैठक झाली. आज विश्रामगृहावर मुंढे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी आ. तान्हाजी मुटकुळे, माजी खा. शिवाजी माने, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, गणेश बांगर, फुलाजी शिंदे आदी उपस्थित होते.मुंढे म्हणाले, राज्यात दुष्काळाचे चित्र गंभीर आहे. किसान मोर्चातर्फे शासनाकडे विविा उपाययोजनांसाठी मागणी करण्यात येणार आहे. यंदा शेतकºयांना लावडखर्च निघेल एवढेही उत्पादन झाले नाही. शिवाय भविष्यात लागवड करणेही अवघड आहे. त्यामुळे शेतीतील नांगरणी, कोळपणीसह कापणीपर्यंतच्या सर्व कामांना मग्रारोहयोतून मजूरी देण्याची मागणी करणार आहोत. शेतीमाल हमीभावाने खरेदीची सक्ती अथवा शासकीय खरेदी केंद्र सुरु करावेत, शेतमजूरांना पेन्शन द्यावी, अशी मागणीही करणार असल्याचे सांगितले. यावेळी सिंचन प्रश्नाचा मुद्दाही पत्रकांरानी विचारला. त्यावर आ. मुटकुळे यांनी १५ हजार हेक्टरच्या अनुशेषातील कामे होणार असल्याचे सांगितले. तर याला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण विरोध करीत असल्याने त्यांचा निषेध व्यक्त केला. चव्हाण हे माजी मुख्यमंत्री राहिले. त्यांनी लहान जिल्ह्यांचाही विचार केला पाहिजे, असे सांगून जयप्रकाश दांडेगावकर यांच्याशीही यावर चर्चा केल्याचेही सांगितले.
दुष्काळी मदतीसाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 11:30 PM