लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : यंदा तूर उत्पादक शेतकऱ्यांना सुरुवातीपासूनच कधी निसर्ग, शासन तर कधी पडलेल्या दराने छळले. अजूनही हे शुक्लकाष्ट संपलेले नाही. मंगळवारी भुसार मोंढ्यात तुरीची अवघी साडेतीन हजार रुपये क्ंिवटल दराने खरेदी झाली. शासन हमीभाव ५४00 रुपयांचा असताना शेतकºयांना मातीमोल किमतीत आपला माल विकावा लागला.हिंगोली जिल्ह्यातील १३ हजार ७२६ शेतकºयांनी नाफेडकडे तूर विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणी केली होती. यापैकी १५ मेपर्यंत जवळपास ६ हजार २0१ शेतकºयांची ६९ हजार ८0१ क्ंिवटल तूर नाफेडने पाच केंद्रांवर खरेदी केली होती. यामध्ये हिंगोली, सेनगाव, कळमनुरी, वसमत, जवळा या केंद्रांचा समावेश होता. तरीही सात हजारांवर शेतकºयांचा माल नाफेडने खरेदी करणे बाकी होते. गोदामांमध्ये जागाच शिल्लक नसल्याच्या कारणावरून उर्वरित शेतकºयांची तूर खरेदी न करता ज्यांनी आॅनलाईन नोंदणी केली, अशांना प्रतिक्ंिवटल हजार रुपये अनुदान देण्याची घोषणा शासनाने केली. त्यालाही खंडीभर निकषांची जोड दिली. त्याचा अजूनही काहीच मागमूस नाही. त्यासाठी अर्ज करायचे की अन्य काही, याचे कोणीही मार्गदर्शन करायला तयार नाही. अनेक शेतकºयांनी तर नोंदणीच केली नव्हती. आता सरसकट शेतकरी मोंढ्यात तूर विक्रीला आणत आहेत. तीनशे ते चारशे पोत्यांची आवक झाली असताना भाव मात्र साडेतीन हजारांवर गेला नाही. पेरणीची गरज भागविण्यासाठी रडकुंडीला येत शेतकरी हा माल या दराने विक्री करताना दिसत होते. भविष्यात हा दरही मिळेल की नाही, या भीतीने शेतकरी माल विकून शेतीखर्च भागवताना दिसत आहे.
मातीमोल भावात विकतेय मोंढ्यात तूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 12:36 AM