सदर गुन्ह्यामधील सोन्याचे दागिने चोरणारे आरोपी हे बिदर (कर्नाटक) येथील असल्याचे गुप्त माहिती मिळाल्यावरुन पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांचे आदेशाने व पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या परवानगीने स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली येथील पोउपनि शिवसांब घेवारे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले. तसेच ते पथक बिदर येथे रवाना करण्यात आले होते. दरम्यान सदर पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाणे गांधीगंज, बिदर येथील स्थानिक पोलिसांच्या मदतीने सदर गुन्ह्यातील अज्ञात व संशयित आरोपींचा शोध घेवून संशयित आरोपी शब्बीर अली पि. अफसर अली (वय ३१,) व मोहमद अली पि.अफसर अली (वय २७) (दोघे रा.ईराणी गल्ली चिद्रा रोड, बिदर, कर्नाटक) हे मिळून आले.
गोपनीय माहितीनुसार व त्यांना विश्वासात घेवून चौकशी केली असता सदर आरोपी व त्याचा एक मोठा भाउ रजा हुसेन उर्फ तसीया अफसर अली व मेहुना गुलाम अली यांनी ११ जानेवारी रोजी सोन्याच्या दागिन्याची चोरी केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यांनीच गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यांच्याकडून आरोपी रजा हुसेन याने गुन्ह्यात वापरलेली एक मोटार सायकल व सोन्याचे दागिने असे एकूण किंमत १ लाख ७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल समक्ष हजर केल्याने तो जप्त केला. सदर आरोपीतांना बिदर राज्य कर्नाटक येथून घेवून येवून गुन्ह्यातील सर्व आरोपी निष्पन्न झाले आहे.
या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आलेल्या दोन आरोपींकडून जप्त करण्यात आलेले सोन्याचे दागिने व एक मोटार सायकलसह पोलीस ठाणे वसमत शहर यांच्या ताब्यात ८ फेब्रुवारी रोजी रिपाेर्टसह देण्यात आले आहे. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक एम.राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि शिवसांब घेवारे, विशाल घोळवे, दीपक पाटील, विठ्ठल काळे, आकाश टापरे यांच्या पथकाने केली आहे. फोटो नं. १३