शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

‘त्या’ दोन मुलांचे अपहरण झालेच नव्हते!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2018 11:57 PM

शहरातील कमलानगर येथून बेपत्ता झालेली दोन मुले पुणे येथे सापडल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यामुळे हिंगोली येथून पोलिसांचे पथक नातेवाईकांसह पुण्याला गेले. दोन्ही मुले पुणे येथील बालगृहात होते. २८ डिसेंबर रोजी दोन्ही मुलांना पोलिसांनी नातेवाईकांच्या स्वाधीन केले. या दोन्ही मुलांनी आम्ही स्त:हूनच ट्रेनने पुण्याला गेलो, असे पोलिसांना सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील कमलानगर येथून बेपत्ता झालेली दोन मुले पुणे येथे सापडल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. त्यामुळे हिंगोली येथून पोलिसांचे पथक नातेवाईकांसह पुण्याला गेले. दोन्ही मुले पुणे येथील बालगृहात होते. २८ डिसेंबर रोजी दोन्ही मुलांना पोलिसांनी नातेवाईकांच्या स्वाधीन केले. या दोन्ही मुलांनी आम्ही स्त:हूनच ट्रेनने पुण्याला गेलो, असे पोलिसांना सांगितले.हिंगोली तालुक्यातील भिंगी येथील भानुदास सोनाजी बुक्कन यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती की हिंगोली शहरातील कमलानगर येथील अनाथ मुलांच्या बालगृहातून त्यांचा मुलगा व त्याच्या मित्राचे कोणीतरी अपहरण केले. त्यामुळे याप्रकरणी बालकांचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली. तसेच विविध पोलीस ठाण्यात दोन मुले मिसिंगची माहिती व त्यांचे फोटोही पाठविले होते. २५ डिसेंबर रोजी ही दोन्ही मुले पुणे येथील रेल्वेस्थानक परिसरात फिरत असताना तेथील पोलिसांना आढळून आली. त्यांनी हिंगोली येथील पोलिसांना मुले सापडल्याची माहिती दिली. हिंगोली येथीलच मुले आहेत, याबाबत खात्री केली त्यानंतर पोलिस पथक व मुलांचे पालक पुण्यात पोहचले. तेथील बालगृहातून मुलांना हिंगोली येथे आणण्यात आले. २८ डिसेंबर रोजी दोन्ही मुलांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी पोउपनि गोहाडे, बालकल्याण समिती सदस्या प्रा. जया करडेकर, प्रा. विक्रम जावळे, अधीक्षक परमिता कांबळे, अनिल शिंदे आदींनी महत्त्वाची भुमिका बजावली. दोघा मुलांचा शोध लागल्याने त्यांचे अपहरण झाले नव्हते हे स्पष्ट झाले. मुले सापडल्याने त्यांच्या पालकांना आनंद झाला.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी