लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : येथील शास्त्रीनगरच्या पाठीमागे शेतात काम करणाऱ्या शेतक-यास विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना ४ मे रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली.कळमनुरी येथील सुनील रामजी पातोंडे (३६) हे शेतात काम करीत होते. यावेळी लोखंडी खांबाला पातोंडे यांचा स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.वारंगाफाटा : कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे विद्युत खांबावर काम करत असताना लाईनमन बापूराव सीताराम ढोले शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना ४ मे रोजी सकाळी ११. ३० वाजता घडली.
विजेच्या धक्क्याने दोघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2018 12:36 AM