प्रतिक्रिया..
जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी झाले आहे. रूग्णांची संख्या कमी होत असली तरी नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. तसेच लसीकरण करून घेणे आवश्यक असून गर्दीत जाणे टाळावे. लहान मुले, गरोदर माता यांनी आरोग्याची विशेष काळजी घ्यावी.
- डॉ. देवेंद्र जायभाये, वैद्यकीय अधिकारी, हिंगोली
अनलॉक नंतर हिंगोली तालुक्यात वाढले रूग्ण
जिल्ह्यातील कोरोना रूग्णसंख्या घटल्याने जिल्हा प्रशासनाने १२ जूनपासून संचारबंदी हटविली आहे. जिल्हा अनलॉक केल्यानंतर हिंगोली तालुक्यात रूग्णांची संख्या वाढली आहे. हिंगोली तालुक्यात सध्या ५८ रूग्ण ॲक्टिव्ह असून त्यानंतर सेनगाव तालुक्यात २० रूग्ण आहेत. तर कळमनुरी १०, वसमत तालुक्यात ३ रूग्ण ॲक्टिव्ह आहेत. औंढा तालुक्यात ६ रूग्ण ॲक्टिव्ह असले तरी तेथील टेस्टची संख्या कमी झाली आहे.
आतापर्यंत झालेल्या आरटीपीसीआर, रॅपिड ॲंटिजन चाचण्या - १५०००० पेक्षा जास्त
बाधित होण्याचे प्रमाण (टक्क्यात) - १.२२
रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (टक्क्यात) -९७
एकूण रूग्ण - १५८७७
बरे झालेले रूग्ण - १५४०३
उपचार सुरू असलेले रूग्ण - १००
मृत्यू झालेले रूग्ण - ३७४
जिल्ह्याचा रिकव्हरी रेट - ९७ टक्के
कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर तालुके - २