लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : तालुक्यातील पूर्णा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात वाळू चोरी होत आहे. याविरोधात सोमवारी सकाळी सेनगाव पोलिसांच्या पथकाने केलेल्या कारवाईत वाळू चोरी करणारे दोन ट्रॅक्टर पकडले असून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महसूलच्या दुर्लक्षामुळे अवैध वाळूचा उपसा वाढला असून स्थानिक महसूलच्या गौण खनिज पथकाकडूनही ठोस कारवाई केली जात नाही. २६ आॅगस्टला सेनगाव ठाण्याचे पोउपनि बाबूराव जाधव यांच्यासह कर्मचारी दिलीप नाईक, आशपाक यांच्या पथकाने केलेल्या कारवाईत दोन ट्रॅक्टर पकडले. याप्रकरणी राहुल बबन केराई (रा. जोगी तांडा, ता. जिंतूर), राहुल वामन राठोड, देवीदास गोवर्धन राठोड या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.
वाळू चोरी करणारे दोन ट्रॅक्टर पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2019 01:17 IST