शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑक्टोबरमध्ये मोदी पाकिस्तानच्या दौऱ्यावर जाणार? शत्रू राष्ट्राकडे शांघाय परिषदेचे यजमानपद
2
ऋषी सुनक ब्रिटनच्या निवडणुकीत पराभवाच्या छायेत? लेबर पार्टीला मोठी आघाडी; मतमोजणी सुरू
3
काँग्रेस नेते राहुल गांधी हाथरसमधील पीडितांच्या घरी पोहोचले, कुटुंबीयांचे सांत्वन केले
4
वंचितच्या मतदारांनी, कार्यकर्त्यांनी मला स्वीकारलं नाही; वसंत मोरेंचा आरोप
5
"मला राजकारण करायचं नाही, पण चूक ..."; हाथरसमधील मृतांच्या कुटुंबीयांची राहुल गाधींनी घेतली भेट
6
टीम इंडियाच्या व्हिक्ट्री परेडदरम्यान अनेकांची तब्येत बिघडली; चेंगराचेंगरीनंतर १० जण रुग्णालयात
7
Hathras Stampede : "बायकोचं काहीही झालं तरी सत्संगला जाणं बंद करणार नाही"; जखमी महिलेच्या पतीने स्पष्टच सांगितलं
8
रेल्वे कंपनीला दिल्ली मेट्रोकडून मोठी डील, बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळाला शेअर; २ वर्षांत १४००% नी वधारला
9
कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी या अभिनेत्रीनं काढून टाकले ब्रेस्ट, म्हणाली-"स्त्री म्हणून मला..."
10
लॅपटॉप, मोबाइलच्या वाढत्या वापरामुळे मानदुखीच्या तक्रारी; वेळीच उपचार घ्या अन्यथा...
11
Union Budget 2024 : एलपीजीच्या सबसिडीसाठी ₹९००००००००००, अर्थसंकल्प २०२४ मध्ये काय होऊ शकतात घोषणा?
12
रोहित शर्माच्या घरी 'ग्रँड सॅल्यूट'ने स्वागत! तिलक वर्मासह बालपणीच्या मित्रांनी खांद्यावर घेतलं; पाहा व्हिडीओ
13
वर्ल्डकप विजय यात्रेनंतर अनुष्काला भेटायला लंडनला गेला किंग कोहली, एअरपोर्टवरील व्हिडिओ समोर, नेटकरी म्हणाले...
14
Hathras Stampede : "आम्ही कोणताही चमत्कार पाहिला नाही..."; शेजाऱ्यांनी केली भोले बाबांची पोलखोल
15
दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना
16
टीम इंडियाच्या मुंबईतल्या व्हिक्ट्री परेडनंतर आणखी एक रॅलीचे आयोजन; स्टार खेळाडूने दिली माहिती
17
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य : ५ जुलै २०२४; नोकरीत पदोन्नती संभवते, रागावर ठेवा नियंत्रण
18
शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात, निफ्टी सपोर्ट लेव्हलवर; HDFC च्या शेअरमध्ये घसरण सुरूच
19
SIP करेल तुमच्या 'होम लोन'चं टेन्शन दूर, व्याजासह वसूल होतील पैसे; जाणून घ्या काय करावं लागेल?
20
विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार?, आज होणार फैसला; माघार कोण घेणार याकडे लक्ष

बैलजोडी परवडेना, हतबल शेतकऱ्याने अखेर भाऊ अन् भाच्याच्या खांद्यावर दिलं जू 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 6:36 PM

मोलमजुरी करणारे कुटुंब आम्हाला बैलजोडी कशी परवडणार? वसमत तालुक्यातील अल्पभूधारक शेतकऱ्याची व्यथा

- इस्माईल जहागीरदारवसमत (जि. हिंगोली): अल्पभूधारक शेतकऱ्यांना बैलजोडी परवडत नाही. बैलजोड्या महाग झाल्या असून अल्पभूधारक शेतकरी उत्पन्न काढणार काय अन् लागवड करणार काय? हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर असतो. त्यामुळे शेती मशागत व पेरणीसाठी बैलजोडी मिळली नसल्यामुळे बालाजी पुंडगे यांनी चक्क सखा भाऊ व साडूच्या मुलास औताला जुंपून हळदीच्या शेतात सरी मारली. शेत मुख्यरस्त्यावर असल्याने शेतात सरी मारताना हा प्रकार समोर आला. 

वसमत तालुक्यातील सिरळी परिसरात पाऊस झाला नसल्यामुळे पेरण्या रखडल्या आहेत. २४ जून रोजी दुपारी १ वाजेदरम्यान अल्पभूधारक शेतकरी बालाजी पुंडगे यांनी आपल्या शेतात हळदीसाठी सरी (दौसा) मारण्यास सुरुवात केली. सरीसाठी बैलजोडी मिळत नाही, आता बैल आणायचे कोणाचे आणि कोठून? हा प्रश्न अल्पभूधारक शेतकऱ्याला पडला होता. यावेळी लहान भाऊ मनोहर पुंडगे व त्यांच्या साडुच्या मुलास औताला जुंपत हळद लागवडीसाठी लागणारी सरी दोघांच्या खांद्यावर जू देऊन पूर्ण केली. 

बालाजी पुंडगे यांचे शेत वाई ते बोल्डा मार्गावर आहे. सरी मारताना बैला ऐवजी माणसाद्वारे औत हाकल्या जात असल्याचे पाहुन अनेक प्रवाशांनी त्या ठिकाणी थांबून हा प्रकार पाहिला.  बैलजोडीचा का वापर करत नाहीत हा प्रश्न अनेकांनी त्यांना केला. यावेळी प्रत्येकाजवळ भाऊक उत्तर देत आपल्या अडीअचणी समोर मांडल्या. मोलमजुरी करणारे कुटुंब आम्हाला बैलजोडी कशी परवडणार ? बैलजोडी घ्यायची म्हटल्यावर ६० ते ८० हजार मोजावे लागतात, असेही त्यांनी सांगितले. बालाजी पुंडगे यांना दोन एकर शेत जमीन असून आर्धा एकरावर हळद आहे.भाऊ व इतर परिवार रोज मजुरी व शेतीची कामे करुन कुटुंबाचा गाडा हाकतात.

टॅग्स :FarmerशेतकरीHingoliहिंगोलीAgriculture Sectorशेती क्षेत्र