लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात समग्र शिक्षा अभियान अंतर्गत गणवेश वाटप पूर्वीप्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीस्तरावरून वितरणाच्या सूचना होत्या. संबधित तालुक्याच्या गशिअ यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे गणवेश वाटपाच अहवालही सादर केला. मात्र काही शाळेतील विद्यार्थी अजूनही गणवेशापासून वंचित असल्याचे चित्र असून पालकांच्या तशा तक्रारी आहेत.शाळा सुरू होताच विद्यार्थ्यांना गणवेश वाटपाचे नियोजन असते. मात्र शालेय गणवेश वेळेवर वाटप कधीच होत नाहीत. शालेय गणवेशाची रक्कम आॅनलाईन बँकेत जमा करण्याची प्रक्रिया सुरू होती. परंतु अनेकांनी बँक खातेच उघडली नाहीत. अनेक विद्यार्थी गणवेशापासून वंचित होते. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच शालेय व्यवस्थापन समिती स्तरावरून गणवेश वितरणाची अंमलबावणी करण्यात आली. मागील अनेक महिन्यांपासून जिल्ह्यात शालेय गणवेश वाटपाची प्रक्रिया राबविण्यात आली. अखेर संबधित तालुक्याच्या गट शिक्षणाधिकाºयांनी सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे शंभर टक्के गणवेश वाटपाचा अहवाल शिक्षणाधिकाºयांकडे दाखल केला आहे. परंतु अजूनही अनेक शाळेतील विद्यार्थी गणवेशाच्या लाभापासून वंचित असून पालकांच्या तशा तक्रारी आहेत.समग्र शिक्षा अभियानअंतर्गत पहिली ते आठवीतील शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळेतील सर्व मुली तसेच अनुसूचित जमातीतील मुले, दारिद्र्य रेषेखालील पालकांच्या मुलांना गणवेश वाटपाची तालुकानिहाय विद्यार्थी संख्या हिंगोली १५ हजार २५३, सेनगाव १४ हजार ३१६, वसमत १४ हजार ४६७, कळमनुरी १४ हजार ६०७ तसेच औंढा नागनाथ ११ हजार ८०२ एकूण ७० हजार ४४५ अशी आहे. यापूर्वी सर्व शिक्षा अभियान अंतर्गत लाभार्थ्यांना दोन गणवेशासाठी ४०० रूपये देण्याची तरतूद होती. यावर्षीपासून आता गणवेशाच्या रक्कमेत वाढ करण्यात आली. समग्र शिक्षा अभियानअंतर्गत आता दोन गणवेशासाठी ६०० रूपये करण्यात आली. शासनाकडून मोफत गणवेश वाटप योजनेसाठी ४ कोटी २२ लाख ६७ हजार रूपयांचा निधी संबधित पाचही तालुक्याच्या गशिअ यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला होता.पुढील शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये समग्र शिक्षा अंतर्गत गणवेश योजनेचा निधी रोख स्वरूपात डीबीटीच्या माध्यमातूनच थेट लाभार्थी विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे. सदर कार्यवाही शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरून करण्यात येणार आहे.जि. प. अंतर्गत गणवेश योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांचे मात्र शंभर टक्के आधार संलग्न बँकखाते उघडणे आवश्यक आहेत. डीबीटी धोरणानुसार बँक खात्याविना गणवेश पात्र लाभार्थी वंचित राहणार नाहीत, याची खबरदारी घेण्याच्यासर्व शिक्षा अभियान, राष्टÑीय माध्यमिक शिक्षा अभियान व शिक्षकांचे शिक्षण या केंद्र पुरस्कृत योजनांचे एकत्रीकरण करून २०१८-१९ या वर्षांपासून समग्र शिक्षा अभियान अंतर्गत गणवेश वाटप केले.
गणवेश वाटप अहवाल सादर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2018 11:48 PM