हिंगोली जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यामध्ये सगळीकडे महावितरणकडून कृषिपंपाची वीज खंडित करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. कृषी पंपाच्या वीज बिलामध्ये महाराष्ट्र राज्य शासनाकडून ६५ टक्के माफी दिलेली आहे, असे बांगर यांनी संबंधितांना सांगितले. तर रब्बी हंगाम ऐन बहरात असताना थकित वीज बिलापोटी कृषी पंपाचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला होता. ही व्यथा शेतकऱ्यांनी आ. संतोष बांगर साहेब यांच्या कानावर घातली. त्यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव व इतर अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शेतकरी आधीच अतिवृष्टीतील नुकसानीमुळे हैराण असल्याने आठ ते दहा हजार रुपये वीजबिल भरू शकत नाहीत. त्यामुळे सध्या फक्त तीन हजार रुपये अर्थात चालू देयक भरू शकतो असे निक्षून सांगितले. यावर महावितरणनेसुद्धा शेतकऱ्यांनी तीन हजारांचे वीज बिल भरण्याची मुभा दिली. सध्या आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे. शिवाय रबीतील हाती आलेले पीक वाया जाण्याची भीतीही दूर होणार आहे.
तीन हजार भरून कृषीपंप जोडणी पूर्ववत करा-बांगर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 4:27 AM