हिंगोली: दुष्काळी आढावा बैठकीत माहिती देता येत नसलेल्या अधिकाऱ्यांना यूजलेस, गेट आऊट फ्रॉम मिटींग असे म्हणत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी अधिकाऱ्यांचे चांगलेच कान उपलटले. मात्र नंतर संयमाने घेत टंचाईत चांगले काम करण्यास बजावले.
हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन समिती सभागृहात आयोजित या बैठकीस विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्यासह जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, सीईओ एच.पी.तुम्मोड, अति.जिल्हाधिकारी जगदीश मिनियार, अति.मुकाअ पी.व्ही.बनसोडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, काम बंद पडले तेथे काय उपाययोजना केले, पाण्याच्या कोणत्या स्त्रोतावर गाव अवलंबून होते, आता त्यात नेमका काय बदल झाला. तुम्ही गावनिहाय ही माहिती का सांगू शकत नाहीत. ही माहिती नसेल तर गावात तपासणीच केली नसल्याचे दिसते. तुम्ही जी माहिती देत आहात ती मी प्रोसिडींगला घेतो, अशी ताकिद दिली. किरकोळ माहिती द्यायलाही एवढा वेळ लागतो कसा? असे ओरडून विचारण्याची वेळ त्यांच्यावर आली. सर्वच तालुक्यांत अशीच परिस्थिती होती. त्यामुळे केंद्रीकर हे एवढा सूक्ष्म आढावा घेतील, याची कल्पनाच नसलेल्या अधिकाऱ्यांची बोबडीच वळली.
यूजलेस गेट आऊट फ्रॉम मिटींग‘यूजलेस’ या शब्दांत खडसावून गेट आऊट म्हणत अधिकाऱ्यांना बाहेर पडण्यास सांगितले. खोटे बोलू नका, तुम्हाला माहिती नव्हते, माझा दौरा आहे. सेल्फ रिस्पेक्ट तर ठेवा काहीतरी. जर दिलेली माहिती खोटी निघाली तर जिल्हाधिकाऱ्यांना सांगून तपासणीनंतर कारवाईचा इशाराही दिला. टँकरशिवाय काय उपाययोजना सुचविल्या. बंधारे किंवा इतर काही जलसंधारणाच्या बाबी घेता येतील. वारंवार टंचाई होत असेल तर अशा गावात उपाययोजना सुचवल्या पाहिजे. त्या सुचवायची जबाबदारी कुणाची आहे? असा सवालही त्यांनी केला.