मध्यंतरी म्हणजे १७ ते १९ एप्रिल असे तीन दिवस कोविशिल्ड व कोवॅक्सिन या लसचे डोस संपल्यामुळे जिल्ह्यातील लसीकरण बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना लसीपासून वंचित राहावे लागले होते. नागरिकांची मागणी लक्षात घेता जिल्हा प्रशासन व जिल्हा रुग्णालयाच्या वतीने लसीबाबत पाठपुरावा केला. त्यानंतर कोवॅक्सिन लस उपलब्ध करुन देण्यात आली. कोविशिल्ड लस मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यात उपलब्ध नाही. त्याचबरोबर कोवॅक्सिन लसही संपत आली आहे. दोन्ही लसीबाबत शासनाकडे पत्रव्यवहार केला असून, एक-दोन दिवसांत कोविशिल्ड व कोवॅक्सिन लस मोठ्या प्रमाणात येईल, असे जिल्हा रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले.
लस संपल्यानंतर नागरिकांनी संयम पाळावा
जिल्ह्यातील ३३ केंद्रांवर लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोविशिल्ड लस दोन दिवसांपूर्वीच संपली आहे. कोवॅक्सिन लसही कमी प्रमाणात आहे. दोन्ही लसींबाबत जिल्हा प्रशासनामार्फत शासनाला कळविले आहे. दोन्ही लस संपल्यानंतर केंद्र बंद ठेवावे लागणार आहेत. तेव्हा नागरिकांनी संयम बाळगावा. बुधवारी सर्वच केंद्रांवर लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत होता.
- डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक