जिल्ह्यातील मसोड, वाकोडी, पोतरा, सीरसम येथे दोन्ही लसींचा साठा सध्या तरी शिल्लक आहे. त्यामुळे त्या ठिकाणी लसीकरण केले जाणार आहे. परंतु, इतर ठिकाणचे लसीकरण मात्र बंद राहणार आहे. लस संपल्याची माहिती शासनाला कळविली असून येत्या दोन दिवसांत लसींचा भरपूर प्रमाणात पुरवठा होईल, अशी माहिती जिल्हा रुग्णालयाच्या वतीने देण्यात आली. १ मे पासून १८ वर्षावरील सर्वच नागरिकांना लसीकरणाचा लाभ मिळणार आहे. यासाठी शासन प्रयत्न करीत असल्याचे रुग्णालयाने सांगितले.
फाटक्या खपटावर सूचना....
लसीकरणासाठी जिल्ह्यातील नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. परंतु, लस संपल्यामुळे नागरिकांना आलेल्या पाऊली परत जावे लागत आहे. लस संपल्याची माहिती आरोग्य विभागाने मोठ्या फलकावर लसीकरण केंद्राच्या बाहेर लावणे आवश्यक आहे. परंतु, तसे न करता फाटक्या खपटावर एका जुनाट लोखंडी गेटवर २२ व २३ एप्रिल रोजी लसीकरण होणार नाही, असे लिहून ठेवले आहे. लिहिलेली सूचना कोणाच्याही निदर्शनास येत नाही. त्यामुळे अनेक नागरिक कल्याण मंडपम येथे येऊन जात आहेत.