शहरं
Join us  
Trending Stories
1
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
4
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
इलॉन मस्क यांनी पुन्हा केलं चकित, स्टारशिप यानातून अवकाशात पाठवली केळी; केला अभूतपूर्व प्रयोग
7
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
8
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
9
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
10
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
11
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
12
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
13
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
14
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
15
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
16
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
17
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
18
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
19
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
20
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार

शाळांत मूल्यवर्धन कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 1:13 AM

विद्यार्थी देशाचे सुज्ञ नागरिक बनावेत, राज्य घटनेतील मूल्ये त्यांच्यात रुजावित, विद्यार्थी लोकशाहीचे जबाबदार संवेदनशिल व कर्तबगार नागरिक बनावेत त्या संबंधीत कौशल्य विकसित करण्यासाठी त्यांना नियोजित अशा संधी सातत्याने देणे यासाठी येत्या जुलै महिन्यापासून तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मूल्यवर्धनाचा कार्यक्रम राबविला जाणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी राजेश पातळे यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : विद्यार्थी देशाचे सुज्ञ नागरिक बनावेत, राज्य घटनेतील मूल्ये त्यांच्यात रुजावित, विद्यार्थी लोकशाहीचे जबाबदार संवेदनशिल व कर्तबगार नागरिक बनावेत त्या संबंधीत कौशल्य विकसित करण्यासाठी त्यांना नियोजित अशा संधी सातत्याने देणे यासाठी येत्या जुलै महिन्यापासून तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मूल्यवर्धनाचा कार्यक्रम राबविला जाणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी राजेश पातळे यांनी दिली.२०१८-१९ या वर्षात हिंगोली जिल्ह्यातून फक्त कळमनुरी तालुक्याची निवड केली आहे. पहिली ते चौथीसाठीच हा मूल्यवर्धनाचा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम महाराष्टÑ शासन व शांतीलाल मुथा फाऊंडेशन पुणे यांच्या वतीने राबविण्यात येणार आहे. यात प्रत्येक केंद्रातील केंद्रप्रमुख व दोन उपक्रमशील शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे शिक्षक नंतर पहिली ते चौथीपर्यंत शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत. मूल्यवर्धनाचा अभ्यासक्रम हा पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमापेक्षा वेगळा राहणार आहे. दोन महिने शिक्षक विद्यार्थ्यांना मूल्यवर्धनाचा अभ्यासक्रम शिकविणार आहेत. ज्ञानरचनावाद, बालस्रेही आनंददायी विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धतीचा वापर, राष्टÑीय अभ्यासक्रम आराखडा २००५, शिक्षण हक्क कायदा २००९, प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २०१२ यावर आधारित अभ्यासक्रम राहणार आहे. नियोजित उपक्रमातून त्यांना आनंददायी बनविले जाणार आहे. मूल्य शिक्षणाची बिजे रुजविणे, विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, पालक या सर्व हितसंबधितांशी संवाद साधणारा समग्र शाळा, दृष्टिकोन अंगिकारून मूल्य रुजविणारा हा कार्यक्रम राहणार आहे.लवचिक कार्यक्रमशाळांच्या गरजा, प्राधान्यक्रम उपलब्ध असणारी साधनसामग्री यानुसार आवश्यक वाटतील, असे बदल करून राबविण्यात येणारा लवचिक हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामुळे अध्यापन विषयीच्या विद्यार्थ्यांच्या अपेक्षा पुर्ण होणार आहे. लवकरच केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांची बैठक घेवून त्यांना या कार्यक्रमाबाबत माहिती दिली जाणार असल्याचे पातळे यांनी सांगितले.

टॅग्स :HingoliहिंगोलीSchoolशाळा