हिंगोली : बारावीच्या परीक्षेस २१ फेबु्रवारीपासून प्रारंभ झाला असून जिल्ह्यातील ३४ परीक्षा केंद्रावरून १२ हजार ७१३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर पहिल्याच पेपरला ५०७ विद्यार्थी गैरहजर राहिले.महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक बारावी बोर्डाची परीक्षेस २१ फेबु्रवारीपासून प्रारंभ झाला आहे. हिंगोली जिल्ह्यातील ३४ परीक्षा केंद्रावरून बारावीची २१ फेबु्रवारी ते २० मार्च कालावधीत बारावीची परीक्षा घेतली जात आहे. गुरूवारी बारावीचा इंग्रजी विषयाचा पहिला पेपर होता. इंग्रजी विषयाच्या पहिल्याच पेपरला मोठ्या संख्येने विद्यार्थी गैरहजर राहिल्याचे दिसून आले.उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा फेबु्रवारी, मार्च २०१९ मध्ये होणाºया परीक्षेस एकूण १३ हजार २७५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी १२ हजार ७१३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर ५०७ विद्यार्थी परीक्षेस गैरहजर राहिले. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी कॉपीमुक्त व शांततामय वातावरणात पेपर सोडवावा, असे आवाहन केले जात आहे. परीक्षा केंद्रावर आश्यक सुविधा आहेत, किंवा नाहीत याचीही केंद्रांना भेटीदरम्यान अधिकाºयांनी पाहणी केली. तसेच आवश्यक सूचनाही दिल्या.विद्यानिकेतन उच्च माध्यमिक विद्यालय कोळसा तसेच तोष्णीवाल कनिष्ठ महाविद्यालय सेनगाव या परीक्षा केंद्रांना उपशिक्षणाधिकारी डी. के. इंगोले यांनी भेटी देऊन पाहणी केली. तसेच तान्हाजी भोसले यांच्या पथकाने बाराशिव हनुमान कनिष्ठ महाविद्यालय, गोकुळनाथ विद्यालय येथील परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. परीक्षा सुरळीत व कॉपिमुक्त वातावरणात पार पडल्याचे शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.सुविधांचा अभावशाळा, महाविद्यालयांवर उपलब्ध साहित्याच्या तुलनेत विद्यार्थीसंख्या संबंधित केंद्रावर देणे अभिप्रेत असताना त्यापेक्षा जास्त विद्यार्थी दिल्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडले. त्यामुळे अर्ध्या मुलांना बाक तर अर्ध्यांना बाकांविनाच परीक्षा देण्याचे प्रकार काही ठिकाणी आढळले. यात पॅड न आणणाºया विद्यार्थ्यांना फटका सोसावा लागला.अधिका-यांकडून केंद्र तपासणीकॉपीमुक्त वातावरणात परीक्षा सुरळीत पार पडावी, यासाठी शिक्षण विभागाकडून काळजी घेतली जात आहे. २१ फेबु्रवारी हिंगोलीत बहुविध प्रशाला परीक्षा केंद्रास मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी.तुम्मोड यांनी भेट देऊन पाहणी केली. केंद्रसंचालकांना आवश्यक सूचनाही दिल्या. वसमत तालुक्यातील आडगाव रंजे येथील केंद्रास डायटचे प्राचार्य गणेश शिंदे यांनी तर हिंगोली तालुक्यातील आडगाव मुटकुळे येथील छत्रपती शाहू महाराज उच्च माध्यमिक विद्यालय येथील परीक्षा केंद्रास शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी भेट दिली.वसमतच्या परीक्षा केंद्राला परभणीचे नाववसमत :येथील हु.बहिर्जी स्मारक महाविद्यालयात परीक्षा देणा-या विज्ञान शाखेतील ६४७ विद्यार्थ्यांच्या नावासमोर बसमतनगर परभणी नाव आल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून बोर्डाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. २१ फेब्रुवारीपासून बारावी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली. हिंगोली जिल्हा असताना परभणीचे नाव आल्याने गोंधळ निर्माण झाला होता. विद्यार्थ्यांना नियमांची शिस्त शिकवणा-या शिक्षण मंडळाचा गाफीलपणा या प्रकारामुळे चहाट्यावर आला आहे. पेपर संपल्यानंतर या प्रकाराबाबत चर्चेला उधाण आले होते.
पहिल्याच दिवशी ५0७ विद्यार्थी गैरहजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2019 1:11 AM
बारावीच्या परीक्षेस २१ फेबु्रवारीपासून प्रारंभ झाला असून जिल्ह्यातील ३४ परीक्षा केंद्रावरून १२ हजार ७१३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर पहिल्याच पेपरला ५०७ विद्यार्थी गैरहजर राहिले.
ठळक मुद्देअधिकाऱ्यांनी दिल्या परीक्षा केंद्रांना भेटी, कॉपीमुक्तीसाठी प्रयत्न