शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी गंगाप्रसाद अग्रवाल अनंतात विलिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 4:28 PM

मराठवाड्याचे भूमिपुत्र ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी गंगाप्रसाद अग्रवाल (96) यांचे वृद्धपकाळाने गुरूवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवदेहावर आज वसमत येथील शासकीय  स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

वसमत (हिंगोली ) : मराठवाड्याचे भूमिपुत्र ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी गंगाप्रसाद अग्रवाल (96) यांचे वृद्धपकाळाने गुरूवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवदेहावर आज वसमत येथील शासकीय  स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव विनोद अग्रवाल यांनी त्यांना मुखाग्नी दिला. 

महात्मा गांधी आणि विनोबाच्या विचारणा आयुष्य समर्पित करणारा लढवय्या आणि वसमत च्या शिरपेचातील हिरा असलेले मराठवाड्याचे गांधी म्हणून आपली ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ सर्वोदयी नेते गंगाप्रसाद अग्रवाल यांना हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थित अखेरचा निरोप देण्यात आला. स्वानंद कॉलनी येथील त्यांचे राहते घरून सकाळी  11 वाजता अंत्ययात्रा निघाली.

शहरातून काढलेल्या या अंत्ययात्रेदरम्यान शहरवासीयांनी पुष्पाच्या पाखळ्यांचा वर्षाव केला. यावेळी शहरातील शाळा महाविद्यालये , बाजारपेठ ही दुपारपर्यंत बंद ठेवून गंगाप्रसादजी यांच्या अंत्ययात्रेत शहरातील सर्व नागरिक व्यापारी तसेच मराठवाड्यातून आलेल्या त्यांच्या चाहत्यांनी, अनुयायींनी आणि त्यांच्या सहवासात हयात घातलेल्या अनेकांनी शोकाकुल वातावरणात त्यांना कोठा रोडवरील शासकीय इतमामात गंगाप्रसादजी अमर रहे  ! चा जयघोष करीत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. 

दरम्यान ,त्यांना विविध पक्ष, सामाजिक संघटना, सर्वोदय चळवळीतील नेत्यांनी आपल्या भाषणातून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांची नात वनिता अग्रवाल यांना गंगाप्रसाद अग्रवाल यांच्या आठवणी सांगताना अश्रू अनावर झाले.मराठवाड्याची गांधीवादी दीपस्तंभ नेतृत्व अनंतात विलीन झाल्याने वसमत सह मराठवाड्यात शोककळा पसरल्याच्या भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केल्या.

गांधी विद्यालयाच्यावतीने दरवर्षी सर्वोदय मंडळातील कार्यकर्त्यांचा दरवर्षी याच दिवशी मेळावा घेऊन त्यांचे विचार पेरण्याचे काम करणार  -  अ‍ॅड . रमेश आंबेकर

वसमत नगरीच्या शिरपेचातला हिरा निखळला हे जीवन समाजासाठीच गेले. आंदोलन म्हणजेच प्रसाद जी अशी भूमिका घेऊन ते जगले. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.- डॉ. व्यंकटेश काब्दे

मराठवाड्याच्या बाहेरी त्यांचे मोलाचे कार्य असून बोदवड अग्रवाल समाजाला मोठे उद्बोधक म्हणून ते प्रेरणादायी ठरले.- राकेश अग्रवाल.

प्रसाद जिनी जीवनभर संघर्ष करून समाजाला खूप काही दिले त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली.- सदाशिवराव पाटील, नांदेड

वसमत चे नावलौकिक करणारे गांधीवादी विचाराचे महान कर्तत्व आमच्यातून गेल्याने समाजाची मोठी हानी झाली.- डॉ. एम.आर. क्यातमवार

शेतकऱ्यांसह मजूरदार, दीनदुबळे व मागास घटकांना दिशा देण्यासाठी प्रेरक ठरले.- ब. ल. तामसकर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, बबनराव लोणीकर यांचा शोक संदेश शिवदास बोड्डेवार यांनी मांडला . स्वातंत्र्य चळवळीतील कीर्तिवंत प्रवाहाचा, समाजवादी विचाराच्या प्रेरणा ज्योतीचा अंत झाला. त्यामुळे मराठवाड्यासह महाराष्ट्रातील सामाजिक चळवळीची मोठी हानी झाली.काका जींनी समाज व देशासाठी संपूर्ण आयुष्य घालविले त्यांच्या जाण्याने गांधीवादी व सर्वोदयवादी विचारात पोकळी निर्माण झाली.- मोहन जी अग्रवाल, जालना

सर्वोदय विचाराचा महान गांधीवादी विचारवंत आपल्यातून निघून गेल्याने सूर्य मळवली यासारखा अंधार झाला.- डॉ. अशोक बेलफोडे

टॅग्स :HingoliहिंगोलीDeathमृत्यूMarathwadaमराठवाडा