शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

Video:"...रट्टे द्यायला लावीन बरं", आमदार संतोष बांगरांचा महावितरणच्या कर्मचाऱ्याला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 7:53 PM

काही दिवसांपूर्वीच आ. संतोष बांगर यांनी मंत्रालयातील पोलिस कर्मचाऱ्याला शिविगाळ केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यामुळे वाद निर्माण झाला होता.

हिंगोलीः शासकीय कर्मचाऱ्यास फोन वरून धमकी देत असल्याचा शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्याला फोन करून इकडची लाईन तोडू नका, नाहीतर रट्टे देईन, अशा भाषेत उघड धमकी दिल्याने आ. बांगर यांचे नाव आणखी एका वादात आले आहे. 

काही दिवसांपूर्वीच आ. संतोष बांगर यांनी मंत्रालयातील पोलिस कर्मचाऱ्याला शिविगाळ केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्यापूर्वी आ. बांगर यांनी एका शासकीय कर्मचाऱ्यास कानाखाली मारली होती. आता ते नव्या वादात अडकले आहेत. थकीत बिल असणाऱ्या ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम सध्या महावितरणने हाती घेतली आहे. यामुळे काही ग्रामस्थांनी वीज कनेक्शन तोडल्याची तक्रार आ. बांगर यांच्याकडे केली. यावर आ. बांगर यांनी लगेच महावितरणच्या कर्मचाऱ्याला फोन करून दमदाटी केली. इकडची लाईन तोडू नका, नाहीतर रट्टे देईन, अशा शब्दांत बांगर यांनी उघड धमकीच दिली. बांगर यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

फोनवरून असा झाला संवाद लाईन कोणी तोडली रे, पवार तू कुठला आहे?. औंढा येथील असून तुला कळत नाही का? दुसरे कोणी असत तर रट्टे द्यायला लावीन बर. तुम्हाला सांगितलं होते लाईनला हात नाही लावायचा. यावर कर्मचारी साहेबांनी तोडण्यास सांगितल्याचे उत्तर देतो. त्यानंतर आ. बांगर त्यांच्याकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नंबर घेतात.

आ. बांगर आणि वाद कर्मचाऱ्यांना धमकावणे, शिविगाळ आणि मारहाण करणे असे अनेक आरोप त्यांच्यावर आहेत. यापूर्वी त्यांनी पीक विम्याच्या मुद्यावरून कृषी अधीक्षकांनाही शिविगाळ केली होती. मंत्रालयातील पोलिस कर्मचाऱ्याला शिविगाळ केल्याचे प्रकरण ताजेच आहे. तसेच मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत कामगारांना जेवणाचे डबे पुरवणाऱ्या गोडाऊनच्या व्यवस्थापकाला तर त्यांनी कानाखाली मारली होती.

टॅग्स :HingoliहिंगोलीShiv Senaशिवसेना