लोकमत न्यूज नेटवर्कनांदापूर : कळमनुरी पसिरातील काही गावांमध्ये रविवारी दुपारी २.०१ मिनीटांनी पहिला तर ३ मिनीटांनी परत दुसरा भुगर्भातून गुढ आवाज आल्याची घटना घडली.या प्रकारामुळे मात्र येथील परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. मागील अनेक महिन्यांपासून असे प्रकार घडत असून भुकंपाची चर्चा ग्रामस्थांतून ऐकवयास मिळत आहे. कळमनुरी तालुक्यातील नांदापूर, जामगव्हाण, आमदरी, पिंपळदरी, राजदरी, सोनवाडी, पांगरा शिंदे आदी परिसरात गुढ आवाज व हादरा बसल्याचे सौम्य धक्के जाणवले. वसमत तालुक्यातील वापटी येथील भूकंपमापक केंद्रबिंदू आहे. परंतु गावांना वारंवार बसणाऱ्या हादºयांकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असून दिवसभरात एकाही शासकीय अधिकाºयाने कुठल्याच गावाला भेट दिली नाही. असे ग्रामस्थांतून सांगितले जात होते. वारंवार भुगर्भातून गुढ आवाजाची रविवारी एकच चर्चा रंगली होती. प्रशासनाकडून काय दखल घेतली जाईल याकडे लक्ष लागले.
भुगर्भातील गूढ आवाजाने ग्रामस्थ भयभीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 12:54 AM